Blood Pressure Sakal
आरोग्य

Men Blood Pressure : वयानुसार पुरुषांचा रक्तदाब किती असावा?

वय आणि वैद्यकीय स्थितीनुसार प्रत्येकाचा रक्तदाब बदलत असतो.

सकाळ डिजिटल टीम

Men Blood Pressure As Per Age : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचे स्वतःच्या आरोग्याकडे (Health) मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. आज अनेकांना रक्तदाबाची (Blood Pressure) समस्या भेडसावत असून, सामान्य रक्तदाब व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्रतिबिंबित करतो. मात्र, जर यामध्ये समतोल राखला गेला नाही तर, आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांना सामोर जावे लागू शकते. ब्लड प्रेशरची समस्या महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक आढळते. वय आणि वैद्यकीय स्थितीनुसार प्रत्येकाचा रक्तदाब बदलत असतो. (Men Blood Pressure As Per Age)

अशा प्रकारे मोजले जाते बीपी

रक्तदाब दोन प्रकारे मोजला जातो. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. ज्याला सामान्य भाषेत आपण हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लडप्रेशर म्हणतो. सिस्टोलिकमध्ये बीपी मोजताना सर्वात जास्त संख्या असते आणि डायस्टोलिकमध्ये ती कमी असते. जसे की 120/80. रक्तदाब मोजण्याचा हा मार्ग आहे.

वयामानानुसार किती असावा पुरूषांचा बीपी

  • 20-25 वर्ष वयोगटातील पुरुषांचे बीपी 120.5/78.5mmHg असावे.

  • 26-30 वर्ष वयोगटातील पुरुषांचे बीपी 119.5/76.5 mmHg असावे.

  • 31-35 वर्ष वयोगटातील पुरुषांचे बीपी 114.5/75.5 mmHg असावे.

  • 36-40 वर्ष वयोगटातील पुरुषांचे बीपी 120.5/75.5 mmHg असावे.

  • 41-45 वर्ष वयोगटातील पुरुषांचे बीपी 115.5/78.5 mmHg असावे.

  • 46-50 वर्ष वयोगटातील पुरुषांचे बीपी 119.5/80.5 mmHg असावे.

  • 51-55 वर्ष वयोगटातील पुरुषांचे बीपी 125.5/80.5 mmHg असावे.

  • 56-60 वर्ष वयोगटातील पुरुषांचे बीपी 129.5/79.5 mmHg असावे.

  • 61-65 वर्ष वयोगटातील पुरुषांचे बीपी 143.5/76.5 mmHg इतके असावे.

वयोमानानुसार एखाद्या व्यक्तीचे बीपी सतत जास्त किंवा कमी होत असेल तर, त्यांनी त्वरीत डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा. तसेच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. 120/80 mmHg चा रक्तदाब सामान्य मानला जात असला तरी तो वयानुसार बदलतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT