Monsoon Special esakal
आरोग्य

Monsoon Special : पावसाळ्याच्या दिवसांत किती पाणी प्यावे? जाणून घ्या एक्सपर्टकडून

डाएट अँड क्युअरच्या डायटीशीयन आणि न्यूट्रिशनीस्ट दिव्या गांधी पावसाळ्यात दिवसभरात किती पाणी प्यावे याबाबत सविस्तर सांगतात

साक्षी राऊत

Monsoon Special : पाणी पिणे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. आणि म्हणूनच तज्ञ दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला देतात. पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते, पोट साफ राहते आणि इतर अनेक समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते.

उन्हाळ्यात आपण जेवढे पाणी पितो त्याच्या तुलनेत फार कमी पाणी आपण पावसाळ्यात पितो. आता तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की पावसाळ्याच्या दिवसात पाणी कमी पिणे योग्य आहे का? डाएट अँड क्युअरच्या डायटीशीयन आणि न्यूट्रिशनीस्ट दिव्या गांधी पावसाळ्यात दिवसभरात किती पाणी प्यावे याबाबत सविस्तर सांगतात.

पावसाळ्याच्या दिवसांत एका दिवसांत किती पाणी प्यावे?

उन्हाळ्यात लोक भरपूर पाणी पितात असे सर्वसाधारणपणे दिसून येते. उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान जास्त असते, त्यामुळे शरीरात पाणी कमी होऊ लागते. परिणामी, शरीरात पाण्याची कमतरता होताच तुम्हाला तहान लागते.

परंतु, याउलट पावसाळ्याच्या दिवसांत असे होत नाही. या दिवसांत हवेत आर्द्रता जास्त असते, त्यामुळे शरीराला घाम येत राहतो. पण, कमी उष्णतेमुळे तहान लागत नाही, त्यामुळे लोक कमी पाणी पितात. मात्र आरोग्यासाठी ते योग्य नाही. पावसाळ्याच्या दिवसातही पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या दिवसातही तुम्ही दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. तहान लागली नसली तरी पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. पावसाळ्याच्या दिवसात पाणी पिणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच स्वच्छ पाणी पिणेही प

रंतु, पाणी शुद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते उकळणे. या दिवसात उकळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पाणी उकळल्याने त्यातील बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट होतात, ज्यामुळे आजारी पडण्याचा धोकाही कमी होतो.

पावसाळ्याच्या दिवसांत योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे फायदे

पावसाळ्याच्या दिवसात पुरेसे पाणी पिऊन तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. पावसाळ्यात लोक सहज आजारी पडू शकतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या देखील खूप सामान्य आहेत. त्यामुळे जर तुम्ही पुरेसे पाणी प्याल तर ते शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. (Monsoon)

पावसाळ्याच्या दिवसात पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचेवरही चांगला परिणाम होतो. पावसाळ्यात त्वचा खूप कोरडी होते. योग्य काळजी न घेतल्यास त्वचा चिकट आणि निर्जीव दिसू शकते. तेव्हा योग्य प्रमाणात पाणी प्या. पाणी पिण्याने मूत्रपिंड, यकृत आणि पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. (Water)

पावसाळ्याच्या दिवसात पुरेशा प्रमाणात पाण्याचा त्वचेप्रमाणेच केसांवरही चांगला परिणाम होतो. केसांची निगा राखण्यासाठी योग्य दिनचर्या पाळल्यास आणि त्यासोबतच योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यास शरीर हायड्रेट राहते. याचा परिणाम तुमच्या केसांवरही होईल. केस निरोगी, मजबूत आणि चमकदार होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT