Mother's Day Special  esakal
आरोग्य

Mother's Day Special : वर्किंग मदरने मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी? वाचा एक्सपर्ट्स सजेशन्स

वर्किंग मदर्सने त्यांचं मानसिक आरोग्य कसं जपावं ते एक्सपर्ट्सकडून जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

Mother's Day Special : ऑफिसच्या कामाचा व्याप सांभाळत घरच्यांची जबाबदारी स्विकारणे सोपे काम नव्हे. एका वर्किंग आईबाबत बोलायचं झाल्यास तिला दिवसरात्र जबाबदारीच्या ओझ्याखालीच जगावे लागते. अशा वेळी स्वत:चं मानसिक आरोग्य तिने योग्यरित्या जपलं नाही तर त्यांचा ताण आणखी वाढू शकतो. तेव्हा वर्किंग मदर्सने त्यांचं मानसिक आरोग्य कसं जपावं ते एक्सपर्ट्सकडून जाणून घेऊया.

परफेक्शनचा विचार करत बसू नका

आई ही नोकरी करणारी वर्किंग मदर असेल तर तिची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना सर्वकाही परिपूर्णतेसह हवे असते. तेव्हा त्यांनी परफेक्शनचा विचार सोडून द्यावा. त्यामुळे त्यांचा ताण वाढतो.

इतरांची मदत घ्या

प्रत्येक आईला घरातील सगळे कामसुद्धा करायचे असतात आणि त्यांना बाहेरचीसुद्धा जबाबदारी सांभाळायची असते. आईंना असे वाटते की त्यांची मुले किंवा त्यांचे पती घरातील जबाबदाऱ्या नीटपणे हाताळू शकणार नाहीत. पण, जेव्हा या माता घरातील इतर कोणत्याही सदस्याची घरातील कामात मदत घेत नाहीत तेव्हा हळू हळू त्यांचा ताण वाढू लागतो. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू लागते. जर तुम्हाला अशी समस्या नसेल तर तुम्ही घरातील कामात इतरांची मदत घेतलेले बरे. तुमच्या ऑफिसमध्येही असेच करा. जर एखाद्या सहकाऱ्याकडून मदत हवी असेल तर त्यांना विचारण्यास अजिबात संकोच करू नका, परंतु मदतीसाठी विचारा आणि आपले काम हलके करा.

ब्रेक घेत रहा

नोकरी करणाऱ्या माता कामातून फार कमी ब्रेक घेताना दिसतात. खरं तर आईला वाटतं की तिने काम केले नाही तर घरात सगळं अस्तव्यस्त राही आणि परिस्थिती बिघडेल. या ओझ्यातून सुटका हवी असेल तर मन हलके ठेवा, मग कामातून ब्रेक घेत राहा. जर तुम्ही लांब ब्रेक घेत असाल तर फिरायला जा. यामुळे तुम्हाला आराम वाटेल आणि मानसिक आरोग्यामध्येही सुधारणा दिसून येईल.

तुमच्या हॉबिजना स्पेस द्या

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी छंद खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. छंद म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे काहीतरी करत आहात, स्वतःला वेळ देत आहात आणि स्वतःला आनंदी ठेवता आहात. काम करणारी आई म्हणून तुम्ही तुमच्या छंदांना जागा द्यावी. छंद म्हणून, तुम्ही चित्रकला करू शकता, खेळाचा भाग होऊ शकता किंवा तुम्हाला आनंदी वाटेल असे काहीही करू शकता. असे काहीतरी केल्याने तुमचे मानसिक आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकते.

प्रायोरीटी सेट करा

जर दिवसाचे योग्य नियोजन केले आणि आपले प्राधान्यक्रम ठरवले तर दिवस सुरळीत जातो आणि तणावाची पातळी कमी होऊ लागते. नोकरी करणाऱ्या आईने हा नियम पाळला पाहिजे. तुम्हाला दिवसभरात काय करायचे आहे, ते कसे करायचे आहे आणि त्या कामासाठी किती वेळ द्यायचा आहे ते ठरवा. अशाप्रकारे, तुमचा संपूर्ण दिवस व्यवस्थित होईल, यामुळे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात मदत होईल आणि तुमची मानसिक तणावाची पातळी आपोआप कमी होऊ लागेल. (Mothers Day)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

सचिन तेंडुलकरसोबत केलं भारतीय संघात पदार्पण; वयाच्या २८ व्या वर्षी क्रिकेटमधून घ्यावी लागली निवृत्ती

Latest Marathi News Update: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला नोटीस

SIP Investment: फक्त 3,500 रुपयांच्या SIP मधून 3 कोटींचा फंड! करोडपती बनण्याचा फॉर्म्युला कसा काम करतो? गणित पाहा!

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

SCROLL FOR NEXT