Nita Ambani Diet Plan esakal
आरोग्य

Nita Ambani Diet Plan : साठीतही तिशीत दिसतात मिसेस अंबानी; नक्की सिक्रेट काय आहे?

खेळापासून ते सामाजिक कामांपर्यंत सगळीकडे अॅक्टिव्ह असणाऱ्या नीता अंबानींच्या सौंदर्याचा राज.

धनश्री भावसार-बगाडे

Nita Ambani Diet Plan : खेळ असू दे किंवा सामाजिक काम सगळीकडेच नीता अंबानी मोठ्या उत्साहात वावरताना दिसताता. त्यांच्या या फीटनेसच तेज त्यांच्या चेहऱ्यावरही झळकतं. नीता अंबानी वयाच्या ५९ व्या वर्षीही अगदी फीट राहतात. त्या आजही त्यांचे डाएट काटेकोरपणे पाळतात आणि स्वतःच्या फीटनेसची काळजी घेतात.

काय काय असतं डाएटमध्ये आणि रुटीन, जाणून घेऊया.

सूप - नीता अंबानी प्रयत्न करतात की, त्यांची एनर्जी लेव्हल कधी कमी होऊ नये. त्या आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि सूप आहारात न विसरता घेतात.

डिटॉक्स वॉटर - डिटॉक्स वॉटरमध्ये शरीरातले टॉक्सिन्स काढण्याची क्षमता असते. त्यामुळेच त्या डिटॉक्स वॉटर प्यायचे विसरत नाहीत. अशा प्रकारे त्यांच्या शरीरातले टॉक्सिन्स काढतात.

फळे - नीता अंबानी कधीही फळं खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे फळं त्यांच्या डाएट प्लॅनचा महत्वाचा भाग आहे.

ड्रायफ्रुट - ड्रायफ्रूट्स तुमच्या शरीरातील पोषक तत्व भरून काढण्याचं काम करतात. शिवाय यामुळे लवकर भूक लागत नाही. नीता अंबानी आपल्या डाएटमध्ये ड्रायफ्रूट्स आवर्जून घेतात.

बीटाचा ज्यूस - बीटाचे किती अनेक फायदे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. म्हणूनच मिसेस अंबानी रोज हा बीटाचा ज्यूस पितात.

शाकाहारी जेवण - संपूर्ण अंबानी कुटुंबच शाकाहारी जेवणावर भर देतात. तसंच नीता अंबानी यांचंही डाएट असतं. याशिवाय त्या स्नॅक्समध्ये स्प्राउट्स खाणे पसंत करतात.

व्यायाम - नीता अंबानी कधीच आपला वर्क आउट मिस होऊ देत नाहीत. त्या जीम शिवाय योगासनही करतात. आणि स्वतःला फीट ठेवण्यासाठी स्विमींगही करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT