Parkinson's Disease Set to Double in Next Decade sakal
आरोग्य

Parkinson's Cases Rise: डोपामीनची कमतरता, हालचालींचा गोंधळ; पार्किन्सनग्रस्त पुढील दशकात होणार दुप्पट!

Parkinson’s Disease in India: डोपामीनच्या कमतरतेमुळे होणारा पार्किन्सन आजार भारतात झपाट्याने वाढतोय; पुढील दशकात रुग्णसंख्या दुप्पट होण्याची शक्यता.

सकाळ वृत्तसेवा

थोडक्यात:

  1. पार्किन्सन हा मेंदू विकार असून डोपामीनची कमतरता यामागील मुख्य कारण आहे.

  2. हा आजार प्रामुख्याने वृद्धांमध्ये दिसतो, पण तरुणांनाही होतो आणि पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे.

  3. भारतात सध्या अंदाजे ४० लाख रुग्ण आहेत आणि पुढील दहा वर्षांत ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.

Growth of Parkinson’s Cases in India Over the Next Decade: मेंदू विकार असलेल्या पार्किन्सन आजारामुळे डोपामीनची कमतरता होते. हा आजार प्रामुख्याने वृद्धांमध्ये होतो, परंतु तरुणांमध्येही आढळत आहे. जगात पार्किन्सनग्रस्त सुमारे १.२ कोटी लोक आहेत. ६५ वर्षांवरील लोकांपैकी एका व्यक्तीमध्ये हा आजार दिसतो. पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे.

भारतात याचे सुमारे ४० लाख रुग्ण असल्याचा अंदाज आहे. परंतु पुढील दहा वर्षांत ही संख्या दुप्पट होऊ शकते, असे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

डॉ. मेश्राम म्हणाले की, पार्किन्सनची मुख्य लक्षणे म्हणजे हालचाली मंदावणे, हात-पाय, जबडा आणि चेहरा थरथरणे, हात-पाय आणि पाठ कडक होणे. चालण्यात अडचण आणि असंतुलन येणे. या आजारावर इलाज नाही, परंतु आयुष्यभर घ्याव्या लागणाऱ्या औषधांनी जीवनमान सुधारता येते. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचाराची आवश्यकता नाही.

दिवसभरात लक्षणे चढउतार होत असतात. जेव्हा रुग्ण सामान्यपणे काम करू शकतो तेव्हा त्याला `ऑन’ कालावधी म्हणतात. जेव्हा लक्षणे जास्त असतात तेव्हा त्याला `ऑफ’ कालावधी म्हणतात. या व्यतिरिक्त, रुग्णांना जास्त अनैच्छिक हालचालींचा अनुभव येतो. ज्याला डिस्किनेसिया म्हणतात.

डीप ब्रेन स्टिम्युलेशन उत्तम पर्याय

जे रुग्ण लेव्होडोपाला प्रतिसाद देतात त्यांच्यासाठी डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) स्वरूपात सर्जिकल थेरपी हा एक चांगला पर्याय आहे, असे युरोपियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या अध्यक्षा प्रा.एलेना मोरो यांनी सांगितले. हे थरथरणे, कडकपणा आणि संथपणा कमी करण्यास मदत करते. परंतु चालण्याच्या असंतुलनावर फायदेशीर परिणाम करत नसल्याचे मोरो म्हणाल्या.

पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचे मत

FAQs

  1. पार्किन्सन आजार नेमका काय आहे आणि तो कोणत्या वयोगटात आढळतो?
    (What exactly is Parkinson's disease and in which age group is it commonly found?)
    पार्किन्सन हा मेंदूचा एक विकार आहे, ज्यामध्ये डोपामीन या रसायनाची कमतरता होते. यामुळे हालचालींमध्ये अडचण निर्माण होते. हा आजार प्रामुख्याने ६५ वर्षांवरील वृद्धांमध्ये आढळतो, मात्र अलीकडच्या काळात तो तरुणांमध्येही दिसून येतो. पुरुषांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो.

  2. या आजाराची प्रमुख लक्षणं कोणती असतात?
    (What are the major symptoms of Parkinson’s disease?)
    पार्किन्सनच्या मुख्य लक्षणांमध्ये हालचाली मंदावणे, हात-पाय, चेहरा किंवा जबडा थरथरणे, स्नायूंमध्ये कडकपणा, चालण्यात अडचण येणे आणि असंतुलन निर्माण होणे यांचा समावेश होतो. तसेच काही रुग्णांना अनैच्छिक हालचाली म्हणजेच डिस्किनेसिया देखील अनुभवास येते.

  3. पार्किन्सनसाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत?
    (What treatment options are available for Parkinson’s disease?)
    पार्किन्सनसाठी सध्या कोणताही पूर्ण उपचार नाही, मात्र औषधांच्या मदतीने रुग्णाचे जीवनमान सुधारता येते. सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना उपचारांची गरज भासत नाही. लेव्होडोपा ही औषधं सामान्यपणे वापरली जातात. लक्षणे चढउतार करणारी असल्याने, ‘ऑन’ आणि ‘ऑफ’ असे कालखंड अनुभवले जातात.

  4. डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजे काय आणि ते कोणासाठी उपयुक्त आहे?
    (What is Deep Brain Stimulation and who can benefit from it?)
    डीप ब्रेन स्टिम्युलेशन (DBS) हा सर्जिकल थेरपीचा एक प्रकार आहे, जो मेंदूमध्ये विशिष्ट भागांमध्ये इलेक्ट्रोड्स लावून होतो. जे रुग्ण लेव्होडोपाला चांगला प्रतिसाद देतात, त्यांच्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. हे थरथरणे, संथपणा आणि कडकपणा कमी करण्यास मदत करते, मात्र चालण्यातील असंतुलनावर फारसा परिणाम करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandani Elephant : हत्तीने भावना जिंकल्या! महादेवीला नांदणीतून निरोप, भट्टारकांच्या डोळ्यांत अश्रू; हत्तीणही रडली, संपूर्ण गावात हळहळ

मोठी बातमी! स्मार्ट मीटरमधून भविष्यात जेवढा रिचार्ज तेवढीच वीज; बिल थकल्यास सुरक्षा ठेवीतून वसुली, दररोज वीजेचा वापर किती? मोबाईलवर समजणार, वाचा...

Dharavi Firing: धक्कादायक! धारावीत गोळीबाराची घटना, महिला घरासमोर उभी होती अन् तेवढ्यात...

Pune News : कारगिल युद्धातील सैनिकाच्या कुटुंबीयांवर झुंडशाही; मध्यरात्री सिद्ध करावे लागले नागरिकत्व

Nandani Elephant Emotional : तळ हाताच्या फोडासारखे जपलेल्या हत्तीणीला निरोप देताना महाराजांचे कंठ दाटले, महिलांना अश्रू अनावर; कधीच आयुष्यात विसरणार नाही...

SCROLL FOR NEXT