pregnancy tips 
आरोग्य

तणावामुळे गर्भपात होतो का? या दिवसांतील तणाव दूर करण्यासाठी काय करावे पहा?

गर्भधारणेदरम्यान महिलांच्या जीवनात अनेक शारीरिक, भावनिक बदल होत असतात

सकाळ डिजिटल टीम

गर्भधारणेदरम्यान महिलांच्या जीवनात अनेक शारीरिक, भावनिक बदल होत असतात

आई होणं हे प्रत्येक मुलीसाठी आणि त्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण असतो. आई होण्यासारखं दुसर सुख दुसरं कोणतं नसतं असे अनेक महिलांना सांगतात. हा काळ कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील एक विस्मरणीय काळ असतो. जो त्या आईच्या आणि बाळाच्या एका नव्या आयुष्याचा भागीदार असतो.

गर्भधारणेदरम्यान महिलांच्या जीवनात अनेक शारीरिक, भावनिक बदल होत असतात. या बदलांमुळे महिलांना बऱ्याचवेळा काही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यातील एक मोठा बदल म्हणजे ताण होय. या दिवसांत महिलांमध्ये ताण येणं ही बाळ आणि आई दोघांच्या आरोग्यासाठी निरोगी नसते. अनेक महिलांना शारीरिक आणि मानसिक बदलामुळे तणाव जाणवू लागतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम जाणवायला लागतो.

दरम्यान, एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, ज्या स्त्रिया सतत तणावाखाली असतात अशांना या काळात जास्तीचा तणाव जाणवतो. या तणावामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बहुतेक स्त्रियांना हा धोका जास्त असतो. त्यामुळे या काळात तणावमुक्त वातावरण उत्तम असते.

तणाव हे गर्भपाताचे कारण असू शकते का?

अनेक शास्त्रज्ञांचा मते, तणावामुळे स्त्रीयांच्या शरीरात एक साखळी तयार होते. ज्याचा परिणाम वाढत्या गर्भावर नकारात्मकरित्या होत असतो. गर्भधारणेदरम्यान सततचा ताण किंवा तणावाची पातळी वाढल्याने गर्भधारणेची संभाव्य गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे या काळात तणावामुळे गर्भपात होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. मात्र अनावश्यक गुंतागुंत टाळण्यासाठी महिलांनी गरोदर असताना तणाव घेणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनीही दिला आहे.

वैज्ञानिक संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते, तेव्हा मेंदू CRH (कॉर्टिकोट्रॉफिन-रिलीझिंग हार्मोन) नावाच्या संप्रेरकासह अनेक हार्मोन्स सोडू लागतो. प्रसूतीदरम्यान गर्भाशयाचे आकुंचन थांबवण्यासाठी CRH ची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र हा तणाव अधिक काळासाठी असेल तर गर्भाशयातील CRH संप्रेरक मास्ट पेशींवर हल्ला करू शकतात. ज्यामुळे गर्भपातास कारणीभूत ठरणारी रसायने शरीरातून बाहेर पडतात.

गरोदरपणात तणाव दूर ठेवण्यासाठी काय कराल?

  • तणावापासून दूर राहण्यासाठी गरोदरपणात दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.

  • गर्भधारणेदरम्यान भावनिक आधार घेण्यास अजिबात संकोच करू नका. यासाठी तुमच्या कुटुंबियांची किंवा मित्रांची मदत घ्या.

  • तुमच्या चिंता आणि समस्या त्यांच्याशी शेअर करून तुमचे हृदय हलके करा.

  • गरोदरपणात स्वतःला जास्त ताण देणे टाळा. अशावेळी जास्त काम करणे टाळा आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा इतरांना मदत करण्यास सांगा.

  • तुम्हाला पुरेशी विश्रांती आणि झोप मिळेल याची खात्री करा. काम करत असाल तर अशावेळी वारंवार ब्रेक घेतल्याने तुम्ही स्वतःला तणावापासून दूर ठेऊ शकाल.

  • तुमचा कामाचा भार कमी करण्यासाठी आणि ते लवचिक बनवण्यासाठी नोकरी करणाऱ्या महिला तुमच्या बॉसशी बोला.

  • तणावापासून दूर राहण्यासाठी तुम्ही चांगली मसाज, आरामदायी स्पा थेरपी, रिफ्लेक्सोलॉजी, ध्यान, योग आणि संगीत यांचाही अवलंब करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT