Raju Srivastava Death sakal
आरोग्य

Raju Srivastava Death: व्यायाम करताय? शरीरासोबत हृदयालाही जपा; Heart Attackला वेळीच रोखा!

जास्त हार्ड एक्सरसाइज केल्यानेही ह्रदयाचे आजार होण्याची शक्यता असते.

सकाळ डिजिटल टीम

भारताचे फेमस स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना काही दिवसाआधी हार्ट अटॅक आला होता. अखेर ४२ दिवसांच्या संघर्षानंतर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा ते दिल्लीच्या एका जिममध्ये एक्सरसाइज करत होते. राजू श्रीवास्तव एक्सरसाइज करताना ट्रेडमिलवर धावत होते. एक्सरसाइज करताना ह्रदयविकाराचा झटका येण्याची भीती असते का? आणि या पासून कसं स्वत:ला जपायचं? या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Raju Srivastava Death take care while doing exercise and avoid heart attack )

असं म्हणतात की एक्सरसाइज केल्यानेही ह्रदयाच्या समस्या आणखी वाढतात आणि अनेक आजार होण्याचीही शक्यता असते. जास्त हार्ड एक्सरसाइज केल्यानेही ह्रदयाचे आजार होण्याची शक्यता असते. अशात ज्यांना आधीपासूनच हार्टसंबंधी समस्या आहे त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

एका रिपोर्टनुसार high intensity exercise केल्याने हार्ट पेंशटच्या लोकांना अचानक कार्डियक अरेस्ट आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो. हार्ट रिदम डिसऑर्डरही होऊ शकतो.

हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ दिसत आहे. चिंतेचा विषय म्हणजे यंग लोकांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याबाबत योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

असं म्हटले जाते की हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हाय ब्लड कोलेस्ट्रॉल असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. एक्सपर्ट्स सांगतात की अशा लोकांनी त्वरीत लक्षणांना ओळखून काळजी घेतली पाहीजे.

हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट पासून वाचण्यासाठी धूम्रपान किंवा मद्यपान टाळावे. अचानक कार्डियक अरेस्टपासून वाचण्यासाठी नियमित हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. जो आधीपासून ह्रदय रोगापासून पिडीत आहे त्यांनी नेहमी डॉक्टरांच्या सल्ला घेत रहावा.

याआधीही अनेक मुव्ही स्टार आणि सेलेब्स यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय. त्यामुळे व्यायम करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT