Join Pain esakal
आरोग्य

Joint Pain मुळे जीव तळमळतोय? आता ही चटपटीत चटणी खाऊन झटपट कमी करा दुखणं

याच्यावर एक चटपटीत उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याने तुमचे दुखणे झटक्यात गायब होईल

साक्षी राऊत

Join Pain Remedy : हल्ली तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना जॉइंट पेनच्या समस्या दिसून येतात. मात्र याच्यावर एक चटपटीत उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याने तुमचे दुखणे झटक्यात गायब होईल.

शिमला मिरची ही एक हिरवी भाजी आहे जी प्रथिने, फायबर, लोह, व्हिटॅमिन सी आणि कार्बोहायड्रेट्स सारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे. शिमला मिरचीचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक पोषकतत्त्वे मिळतात.

शिमला ही सहसा भाजी म्हणून किंवा फास्टफूडमधे सर्वाधिक यूज केली जाते. पण तुम्ही कधी शिमला मिरचीची चटणी चाखली आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी शिमला मिरची चटणी बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. शिमला मिरचीचे सेवन केल्याने मधुमेहापासून वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. एवढेच नाही तर शिमला मिरची तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासही मदत करते. शिमला मिरची चटणी चवीला खूप मसालेदार दिसते. तसेच बनवायला फक्त 10 मिनिटे लागतात, चला तर मग जाणून घेऊया शिमला मिरचीची चटणी कशी बनवायची ते.

शिमला मिरची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हिरवी मिरची ३-४

शिमला मिरची १

थोडे तेल

धणे १ वाटी

पुदिना १ कप

लसूण पाकळ्या ३-४

आले १ लहान

थोडासा लिंबाचा रस

चाट मसाला १ टीस्पून

काळे मीठ अर्धा चमचे

जिरे 1 टीस्पून भाजलेले

चवीनुसार मीठ

दही 2 टेस्पून

अर्धा कप बर्फाचे पाणी (Recipe)

शिमला मिरची चटणी कशी बनवायची?

शिमला मिरची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर आणि पुदिना घ्या.

यासोबतच हिरवी मिरची, आले आणि शिमला मिरचीही घ्यावी.

मग तुम्ही या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे धुवा.

यानंतर हिरव्या मिरच्या आणि शिमला मिरचीला थोडे तेल लावून तळून घ्या.

नंतर शिमला मिरची स्वच्छ करून त्याचे छोटे तुकडे करा.

यानंतर या सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यात टाका.

नंतर या सर्व गोष्टी नीट बारीक करून चटणी बनवा.

आता तुमची स्वादिष्ट शिमला मिरची चटणी तयार आहे. (Joint Pain)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT