Microplastic Inside Human Lungs
Microplastic Inside Human Lungs  e sakal
आरोग्य

बापरे! रक्तानंतर आता मानवी फुफ्फुसात देखील आढळलं मायक्रोप्लास्टिक

सकाळ डिजिटल टीम

जगात प्रथमच जिवंत मानवी फुफ्फुसातील मायक्रोप्लास्टिक्स जिवंत माणसाच्या फुफ्फुसात सापडले आहेत. शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या आधारे दावा केला आहे की, हे मायक्रोप्लास्टिक श्वसनाद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचले असून या संशोधनातून पृथ्वीवरील हवा किती मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे हे दिसून आले आहे..

शास्त्रज्ञांनी प्रथमच एका मोठ्या अभ्यासात जिवंत व्यक्तींच्या फुफ्फुसात अडकलेले मायक्रोप्लास्टिक शोधून काढले आहे. यातून आपण हे धोकादायक पदार्थ आपण नकळत शरिरात घेत असल्याचे समोर आले आहे. नवीन अभ्यासामुळे श्वसनसंस्थेवर याचा धोकादायक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.

मायक्रोप्लास्टिक्स हे लहान प्लास्टिकचे तुकडे आहेत जे पाच मिलिमीटरपेक्षा कमी लांबीचे असतात आणि ते समुद्र, हवेसह सगळीकडे पसरलेले आढळतात. हे मोठ्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्यापासून लहान-लहान होत जातात. हे लहान कण पाण्याच्या गाळण्याची प्रक्रियेमधून सहज निघून जातात आणि शेवटी समुद्रात पोहचतात ज्यामुळे पाण्यात वाढणाऱ्या जीवंना देखील धोका निर्माण होतो.

हल यॉर्क मेडिकल स्कूल आणि हल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या पथकाला 13 फुफ्फुसाच्या ऊतींच्या नमुन्यांपैकी 11 मध्ये 39 मायक्रोप्लास्टिक आढळले, जे मागील कोणत्याही प्रयोगशाळेतील चाचण्यांपेक्षा जास्त आहेत. हा अभ्यास जर्नल सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्नमेंटने प्रकाशनासाठी स्वीकारला आहे.

मायक्रोप्लास्टिक्स पूर्वी मानवी शवविच्छेदन नमुन्यांमध्ये आढळले आहेत, जिवंत लोकांच्या फुफ्फुसातील मायक्रोप्लास्टिक्स दाखवणारा हा पहीलाच ठोस अभ्यास ठरला आहे. या आभ्यासातून ते मायक्रोप्लास्टीक फुफ्फुसाच्या खालच्या भागात आढळल्याचे समोर आले. फुफ्फुसाचे वायुमार्ग खूपच अरुंद असतात त्यामुळे ते तेथे पोहोचू शकतील असे कोणालाही वाटले नाही, परंतु ते स्पष्टपणे आढळून आले आहेत, असे डॉ. लॉरा सॅडोफस्की, हल यॉर्क मेडिकल स्कूलमधील रेस्पिरेटरी मेडिसिनच्या वरिष्ठ लेक्चरर आणि पेपरच्या प्रमुख लेखिका यांनी सांगितले आहे.

हा अभ्यास जिवंत फुफ्फुसाच्या ऊतींवर करण्यात आला होता, ज्यामध्ये रुग्ण जिवंत होते, त्यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीचा भाग म्हणून केलेल्या शस्त्रक्रियेतून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान शास्त्रज्ञांनी 12 विविध प्रकारचे मायक्रोप्लास्टिक्स शोधून काढले आहेत ज्यांचे अनेक उपयोग आहेत आणि ते सामान्यतः पॅकेजिंग, बाटल्या, कपडे, दोरी/सुतळी आणि अनेक उत्पादन प्रक्रियांमध्ये आढळतात. महिलांच्या तुलनेत पुरुष रुग्णांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाणही जास्त असल्याचे या टीमने सांगितले.

फुफ्फुसांच्या खालच्या भागात सर्वात जास्त प्रमाणात हे कण सापडण्याची आम्हालाअपेक्षा नव्हती. हे आश्चर्यकारक आहे, कारण फुफ्फुसाच्या खालच्या भागात वायुमार्ग लहान आहेत आणि आम्हाला अपेक्षा होती की फुफ्फुसात खोलवर जाण्यापूर्वी हे कण आडकतील किंवा फिल्टर केले जातील, असे संशोधक डॉ. लॉरा म्हणाल्या.

अभ्यासात फुफ्फुसाच्या वरच्या भागात 11 मायक्रोप्लास्टिक्स, मध्यभागी सात आणि फुफ्फुसाच्या खालच्या भागात 21 मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले जो एक अनपेक्षित शोध होता. संशोधकांना अशा काही आकाराचे मायक्रोप्लास्टिक्स देखील सापडले आहेत जे मानसांना श्वासातून आत घेता येणे शक्य नाही.

संशोधकांना याआधी रक्तामध्ये हे छोटे प्लास्टिकचे कण आढळून आले होते ज्यामुळे जगभरातील आरोग्याची चिंता वाढली होती. यापूर्वी, या लहान कणांचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनी त्यांना फ्रेंच पायरेनीजमध्ये 2,877 मीटर उंचीवर Pic du Midi च्या आसपासच्या हवेत शोधले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT