fruits  sakal
आरोग्य

Health Tips: फळांवर चिमूटभर मीठ-चाट मसाला टाकून खाताय? तर सावधान! होईल नुकसान

प्रत्येकाची फळे खाण्याची स्वतःची पद्धत असते.

Aishwarya Musale

फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक घटक आढळतात. फळे खाल्ल्याने आपली चयापचय आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे आपले शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते. पण काही लोक फळांची चव वाढवण्यासाठी मीठ, साखर किंवा चाट मसाला घालतात.

अनेक लोक फळे खाताना त्याच्यावर मीठ मसाला टाकून खातात. पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की फळांवर मसाले टाकल्यानंतर पाणी कसे सुटते? फळांतून पाणी येतं म्हणजे त्यातून पोषण बाहेर पडतं. याशिवाय मीठ आणि चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. फळांवर मीठ, चाट मसाला किंवा साखर टाकण्याची गरज नसते.

किडनीला होते नुकसान

मीठ किंवा मसाल्यांमध्ये सोडियम आढळते. या सोडियममुळे आपल्या शरीरातील पाणी तर वाढतेच पण किडनीवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्हाला किडनीच्या आजाराने ग्रासले असेल तर तुम्ही मीठ किंवा मसाल्याशिवाय फळे खावीत.

नाही मिळणार पोषणतत्व

पोषक तत्वांचे फळांना पॉवर हाऊस म्हटले जाते. फळे नियमित खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व मिळतात. फळांमध्ये आढळणारी पोषकतत्त्वे केवळ वजन संतुलित ठेवत नाहीत तर ते वजन कमी करण्यासही मदत करतात.

पण फळांवर मीठ किंवा कोणताही मसाला टाकताच फळांमधील आवश्यक पोषक तत्वे नष्ट होतात आणि फळे पूर्वीसारखी निरोगी राहत नाहीत.

वेलची वापरा

आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी एका वेळी एक फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या फळांवर वेलची आणि काळी मिरी वापरू शकता. याशिवाय हिवाळ्यात तुम्ही दालचिनी आणि लवंग पावडर वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT