Sprouts Eating Rules esakal
आरोग्य

Sprouts Eating Rules : अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर या गोष्टी खाणे टाळा, नाहीतर...

अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबद्दल या लेखात सविस्तर जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Sprouts Eating Rules : सकाळी अंकुरलेल्या हरभऱ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. शरीरातील अशक्तपणा दूर करण्यापासून ते आजारांपासून बचाव करण्यापर्यंत याचा वापर खूप फायदेशीर मानला जातो. अंकुरलेल्या हरभऱ्यामध्ये कॅल्शियम, प्रोटिन, लोह, फायबर आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात आढळतात. याचे नियमित सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे मिळतात.

पण काही लोक मात्र याचे सेवन चुकीच्या पद्धतीने करतात, ज्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. सकाळी अंकुरलेला हरभरा खाल्ल्यानंतर लगेच काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबद्दल या लेखात सविस्तर जाणून घेऊया.

अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर काय खावे काय खाऊ नये?

हरभरा खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते. रिकाम्या पोटी अंकुरलेले हरभरे खाणे आरोग्यासाठी औषधांपेक्षा कमी नाही. आरोग्य हेल्थ सेंटरचे क्लिनिकल डायटीशियन डॉ. व्ही.डी. त्रिपाठी म्हणतात, "जे लोक रोज रिकाम्या पोटी हरभरे खातात त्यांना आजारांचा धोका कमी असतो.

पण चुकीच्या पद्धतीने याचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारे हानीही होऊ शकते." काही गोष्टींचे सेवन केल्यानंतर लगेच काही खाणे टाळावे. चुकीच्या पद्धतीने अंकुरलेले हरभरे खाल्ल्याने पोट आणि पचनाशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

1. हरभरा खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे टाळा

अनेकजण अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर लगेचच दुधाचे सेवन करतात. दूध आणि हरभरा हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण सकाळी रिकाम्या पोटी अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने त्वचेच्या समस्या होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्हाला पांढऱ्या डागाचा आजारही होऊ शकतो.

2. हरभरा खाल्ल्यानंतर लगेच अंडी खाऊ नका

सकाळची सुरुवात अंकुरलेले हरभरा खाल्ल्यानंतर अंडी खाऊन केलीत तर नक्कीच तुम्ही एखाद्या आजाराला बळी पडाल. हरभरा आणि अंडी दोन्हींमध्ये प्रोटीन भरपूर असतात. अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर लगेच अंडी खाल्ल्यास पोटात रिअॅक्शन होऊ शकते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका आहे.

3. हरभरा खाल्ल्यानंतर लोणचे खाणे

सकाळी अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर लोणचे खाणे टाळावे. लोणच्यामध्ये आम्ल असते आणि हरभरा खाल्ल्यानंतर पोटात पित्त वाढू शकतं. यामुळे पोटदुखी आणि जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय असे केल्याने हृदयाशी संबंधित समस्यांचाही धोका असतो. (Lifestyle)

4. कारले

अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर कारले खाणे देखील टाळावे. या गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने शरीरात रिअॅक्शन होते आणि त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

5. लसूण

अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर लसूण खाल्ल्याने त्वचेशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. तुम्ही उकडलेल्या हरभऱ्यासोबत लसूण खाऊ शकता, पण कच्च्या किंवा अंकुरलेल्या हरभऱ्यासोबत खाणे टाळा. (Health)

सकाळी रिकाम्या पोटी अंकुरलेले हरभरे खाणे वजन कमी करण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, व्हिटॅमिन बी आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारखे गुणधर्म असतात. याचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. पण हरभरा खाल्ल्यानंतर लगेच वरील गोष्टी खाणे टाळावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT