Steroids harmful to bones sakal
आरोग्य

हाडांसाठी 'स्टेरॉईड' घातक

जीममध्ये तरुणाईने नक्कीच जावे पण व्यायामापूर्वी काही नियम कटाक्षाने पाळावे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चित्रपटातील (Movies) नायकाचे सिक्स पॅक पाहून तरुण त्याचा कित्ता गिरवायला लागतात. काही तर अक्षरशः वेडे होतात.

‘सिक्स पॅक(Six pack)’साठी मग युवा जीमचा (Gym) मार्ग धरतात. बॉडी बनवायची म्हणून घाम गाळतात. जीमने बॉडी बनतेही. पण शरीर सुडौल दिसावे म्हणून शॉर्टकटचा वापर केल्या जातो. सकस आहाराबरोबर घेतात. परंतु, शरीर सुडौल दिसण्याच्या लोभापायी स्टेरॉईडचाही वापर करतात. बॉडी बनविण्याचा हा शॉर्टकट अंगाशी येण्याची शक्यता असते. कारण स्टेरॉईडच्या सेवनाने हाडे ठिसूळ (Osteoporosis) होण्याचा धोका असतो.

जिममध्ये किंवा व्यायामशाळेत (Exercise school) येण्यामागचा उद्देश चांगलाच असतो. परंतु जीममध्ये गेल्यानंतर अनेकदा कळत न कळत चुका होतात. जीमला जाण्यापूर्वी अनेकजण प्रथिने आणि शरीराला ऊर्जा (Body energy) प्रदान करणारे तंतुमय खाद्य पदार्थांचे सेवन करतात. यामुळे पचनसंस्था बिघडण्याचा धोका असतो. यामुळे व्यायामाचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतात, अशी माहिती प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी दिली. जीममध्ये तरुणाईने नक्कीच जावे पण व्यायामापूर्वी काही नियम कटाक्षाने पाळावे. अनेकदा जीम चालकही या गोष्टीपासून अनभिज्ञ असतात. चुका टाळून व्यायाम केल्यास चांगलाच परिमाण दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.

वॉर्मिंग अप, स्ट्रेचिंग नक्कीच करा

जीममध्ये अनेक जण वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग करायला कंटाळतात. परंतु, असे करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी किमान ५ मिनिटे वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग जरूर करावे. सावकाश सुरुवात करून मगच त्यात वाढ करावी. तसेच ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी इंधनाची गरज असते, त्याचप्रमाणे जिम करताना शरीराला ऊर्जेची आवश्यकता आहे.

जीमला जाण्यापूर्वी

- जास्त पाणी पिऊ नका

- झोप पूर्ण होऊ द्या

- चहा-कॉफी घेऊन जीम करू नका

- शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ घेऊ नये

- क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलू नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शालेय पास आता लांबपल्ल्याच्या बसमध्येही चालणार; सोलापूर जिल्ह्यातून हेल्पलाईनवर सर्वाधिक तक्रारी

आजचे राशिभविष्य - 06 डिसेंबर 2025

Weekend Breakfast Recipe: वीकेंडला नाश्त्यात 'हेल्दी स्प्रींग रोल' ट्राय केले का? सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ग्रहमान : ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

Pune News : शीतल तेजवानीच्या घरझडतीत महत्त्वाची कागदपत्रे जप्त

SCROLL FOR NEXT