Over Thinking
Over Thinking esakal
आरोग्य

Over Thinking : तुम्हाला तुमच्याच ओव्हर थिंकींगचा त्रास होतो? फॉलो करा ‘या’ 10 टिप्स

सकाळ डिजिटल टीम

Stop Overthinking and Get Joy : कोणतीही गोष्ट विचारपुर्वक करावी हे खरं आहे. पण बऱ्याचदा आपण अतिविचार करतो आणि त्याचा स्वतःलाच त्रास करून घेतो. अतिविचार कधी कधी इतका वाईट स्वरूप धारण करतो की, लोक निराश आणि अस्वस्थ होऊ लागतात. त्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. नकारात्मकता वाढते. यातून बाहेर पडणं त्यावेळी तरी अशक्य वाटत असतं. पण ते अशक्य नाही. हे काही सोपे उपाय करून या त्रासातून बाहेर पडता येतं.

1. नकारात्मक परिस्थितीत जरावेळ थांबा

अतिविचार हे मुख्यतः एका भावनेमुळे निर्माण होतो ती म्हणजे भीती होय. लोक जेव्हा सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करू लागतात तेव्हा ते थांबतात. आपण नकारात्मक गोष्टी प्रत्यक्षात असण्यापेक्षा खूप मोठ्या आकारात पाहू लागतो. पुढच्यावेळी अशावेळी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जावे लागले तर थोडा वेळ थांबा.

  • ज्या गोष्टीबद्दल तुम्ही नकारात्मक विचार करत आहात, त्यात चांगले किंवा बरोबर काय आहे याचा विचार करा.

  • तुमच्या समोर सकारात्मक परिणाम पाहण्याचा प्रयत्न करा.

  • ५ वर्षांनंतर तुमच्या आयुष्याच्या संदर्भात एखाद्या नकारात्मक घटनेचे काय महत्त्व आहे हे देखील तुम्ही स्वतःला विचारू शकता.

2. भीतीबद्दल दृष्टीकोन बदला

ओव्हर थिंकींगच मूळ भीती असतं. त्यामुळे एकतर तुम्ही भूतकाळातल्या अपयशाला घाबरत असाल किंवा इतरांच्या अपयशाला स्वतःशी जोडत विचार करत असाल. ते आधी थांबवा. प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि परिणाम वेगवेगळे असतात. जे आधी घडलं तेच पुन्हा घडेल असं समजू नका. प्रत्येक संधी नवी सुरूवात असते.

3. वर्तमानाचा विचार करा

उद्या कोणी पाहिला आहे? असं म्हटलं जातं. त्यामुळे आजमध्ये जगा. उद्याची चिंता करत आज खराब करू नका. तुम्ही भविष्याची काळजी करत वर्तमान जगत असाल तर ते योग्य नाही. आजमध्ये जगलात तरच आनंद मिळेल.

4. स्वतःला कमी लेखू नका

बऱ्याचदा आपण केलेल्या गोष्टींवर आपलाच पुर्ण विश्वास नसतो. आपण पूर्ण प्रयत्न केलेत हे माहित असूनही आत्मविश्वास कमी पडतो. त्यातून भीती, चिंता जन्माला येते आणि अतिविचार सुरु होतात. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केले, तेव्हा जे काही निष्पन्न होईल ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. कधीकधी यश अनेक गोष्टींवर अवलंबून असते ज्यावर तुमचे नियंत्रण नसते.

5. प्रत्येक दिवस भरभरून जगा

आजचा दिवस शेवटचा असं समजून प्रत्येक दिवस भरभरून जगून घ्या. हा आनंद पुन्हा मिळणे नाही, असा विचार करा. चिंतांचा अतिविचार करण्यापेक्षा आता हातात असलेल्या वेळात मी आणखी चांगलं काय करू शकेन. माझ्या आवडीचं असं काही करायचं राहून गेलंय, ते आता करणं शक्य असेल तर ते करा आणि आनंदी रहा.

6. नेहमीच्या कामांमध्ये जास्त जोखीम घ्या

तुम्हाला जे काम करायचे आहे, त्याविषयी प्लॅनिंग करा. त्याच्या प्लस, मायनस पाँइंट्सचा विचार करून तसे तयारीत रहा. अधिक झोकून देत, सक्षमतेने प्रयत्न करा. तरीही जर नकारात्मक परिणाम समोर आले तर त्याला तयार रहा.

7. नव्या अॅक्टिव्हिटीजमध्ये सामील व्हा

नवनवीन गोष्टी करण्यावर भर द्या. कोणतीही गोष्ट शिकण्याची प्रत्येकाची कधी ना कधी पहिलीच वेळ असते. त्याविषयी न्यूनगंड बाळगू नका. त्यामुळे बेसिक पासून शिकण्याची तयारी ठेवा.

8. आवडीचे काम पुढे ढकलण्याऐवजी करुन टाका

विचार करा तुमची अशी कोणती इच्छा आहे, जी तुम्हाला खूप दिवसांपासून करायची होती. परंतु तिला प्राधान्य देता आले नाही. हे काम करण्यापासून तुम्हाला जे काही अडवत असेल त्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण करा.

9. परफेक्शनिस्ट बनणे थांबवा!

स्वतः कडून, इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका. जगात परफेक्ट असं काहीच नाही. त्यामुळे स्वतःही परफेक्शनिस्ट असण्याचा अट्टाहास सोडा. यानंतर तुम्हाला जे मिळेल ते बोनससारखे असू शकते. आपण स्वत: ला थोडे कमी गंभीरपणे घेऊ शकता का? तर असे का हे एकदा विचारा. खरं तर, आनंद, कल्पना आणि सर्जनशीलता यासारख्या गोष्टी नेहमीच उघडपणे समोर येतात, गंभीर मार्गाने नाही.

10. मेंदूचा अति वापर थांबवून मनाचेही ऐका

कभी कभी दिमाग की नही दिल की सुनना अच्छा होता है... हे वाक्य हिंदी सिनेमात बऱ्याचदा ऐकलेलं असतं. त्याचा वैयक्तीक आयुष्यात कधीकधी उपयोग करणं आपल्याच फायद्याचं असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT