excessive sweating causes
excessive sweating causes Esakal
आरोग्य

Excessive Sweating: थंडी, पावसातही तुम्हाला घाम येतोय, वर्षभर खूप घाम येत असले तर हे आहे एका गंभीर आजाराचं लक्षण

Kirti Wadkar

Excessive Sweating : तसं तर घाम येणंSweating ही एक सामान्य बाब आहे. एवढचं नव्हे तर घाम येणं हे एक निरोगी असल्याचं लक्षण आहे. उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे Summer घाम येणं, तसचं एखादं कष्टाचं काम, वर्कआऊट करताना घाम येणं अगदी सामान्य गोष्ट आहे. घाम आल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. Sweating in Winter and Monsoon know the reasons and be aware

मात्र जर तुम्हाला वर्षभर कायम घाम येत असेल Sweating. अगदी थंड वातावरणातही घाम येणं खास करून तुमच्या हातांना आणि तळव्यांना जर कायम घाम येत असेल तर याचा अर्थ तुम्हाला आरोग्याची Health समस्या निर्माण झाली आहे. वर्षभर थंड वातावरणातही घाम येत असले तर याला हाइपरहाइड्रोसिस (hyperhidrosis) असं म्हणतात.

साधारणपणे घाम आल्यामुळ शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र हाइपरहाइड्रोसिस जर तुम्हाला घाम येत असेल तर त्यासाठी औषधोपचार किंवा काही उपाय करणं गजजेचं आहे.

हायपरहायड्रोसिसची कारणं

हायपरहायड्रोसिसमध्ये व्यक्तीच्या शरीरातील घामाच्या पेशी या ओव्हरऍक्टिव्ह म्हणजेच अतिक्रियाशील होतात. यामुळेच कोणतही कारण नसताना घाम येऊ शकतो. यामुळे मात्र अनेकदा डिहायड्रेशन आणि लो ब्लड प्रेशरचा धोका निर्माण होवू शकतो.

अशा व्यक्तींना कोणताही तणाव नसतानाही हातांना आणि पायाच्या तळव्यांना जास्त घाम येऊ लागतो. हायपरहायड्रोसिस हा आजार मधुमेह, थायरॉइड, मोनोपॉज हॉट फ्लॅश, लो ब्लड प्रेशर, कॅन्सर, हृदयाचे विकार किंवा नर्वस सिस्टम डिसऑर्डरमुळे होवू शकतो.

यामध्ये व्यक्तीला पाठीचा खालचा कंबरेकडील भाग, पायांचे तळवे, हात, प्रायव्हेट पार्ट, चोहरा, गाल आणि कपाळावर मोठ्या प्रमाणात सतत घाम येतो.

हे देखिल वाचा-

हायपरहायड्रोसिससाठी काही घरगुती उपाय

एका बादली किंवा टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा मिसळावा. या पाण्यामध्ये काही मिनिटांसाठी हात आणि पाय बुडवून ठेवावे. या पाण्यातून हात पाय बाहेर काढल्यानंतर काही तास घाम येणार नाही.

यासाठी तुम्ही टी बॅग्सचा वापर देखील करू शकता. पाण्यामध्ये ३-४ टी बॅग टाकून त्यात हात आणि पाय बुडवून ठेवावे. या पाण्याने तुम्ही चेहरा देखील धूवू शकता. यामुळे घामाचं प्रमाण कमी होईल.

तसचं आहारामध्ये कांदा, लसूण आणि मसाल्यांचं सेवन कमी करा.

मेडिटेशन म्हणजेच ध्यान करूनही यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणं शक्य आहे.

काही वेळेस वाढलेल्या वजनामुळे देखील ही समस्या निर्माण होवू शकते. अशात डॉक्टरांच्या सल्ल्याने वजन नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT