Food Allergy in Children google
आरोग्य

Food Allergy in Children: जरा खाल्लं तरी उलट्या करतं बाळ; या अॅलर्जीवर उपाय काय ?

पाच वर्षाखालील ५% मुलांमध्ये अॅलर्जी असल्याचे दिसते. १९९७ ते २००७ दरम्यान १८ वर्षांखालील मुलांमध्ये फूड अॅलर्जीचे प्रमाण १८%ने वाढल्याची नोंद आहे.

नमिता धुरी

Food Allergy in Children: अन्नापासून होणारी अॅलर्जी ही काही असामान्य गोष्ट नाही; विशेषतः थंडीत लोक यथेच्छ खातात आणि शारीरिक हालचाल आणि व्यायाम कमी करतात तेव्हा ही बाब अगदीच सामान्य असते.

सर्वसाधारणपणे अॅलर्जी म्हणजे काही विशिष्ट खाद्य पदार्थांच्या बाबतीत शरीराची काही विशिष्ट प्रतिक्रिया. आयजीइ (IgE) अॅंटीबॉडीज अन्नावर प्रतिक्रिया देतात व त्यामुळे हिस्टामिन उत्पन्न होते.

परिणामी मुलांच्या अंगावर पित्त उठणे, तोंडाला खाज सुटणे, दमा, श्वास घेण्यास त्रास होणे, पोटात गडबड होणे, श्वासात घरघर येणे, रक्तदाब कमी होणे उलट्या होणे किंवा अतिसार वगैरे शारीरिक लक्षणे दिसू लागतात.

फूड अॅलर्जीमुळे उद्भवणार्‍या रोगप्रतिकार प्रणालीच्या प्रतिक्रियेमुळे तुमच्या मुलात काही लक्षणे दिसू लागतात,जी त्रासदायक असतात किंवा कधी कधी घातक देखील ठरू शकतात. हेही वाचा - ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

पेडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका उडावत यांच्या मते गहू, दुधाचे पदार्थ, शेंगदाणे, सोया आणि नट्स हे लहान मुलांमध्ये अॅलर्जी निर्माण करणारे सामान्य पदार्थ आहेत तर बर्‍याचदा नट्स, मासे आणि शेलफिश यांच्यामुळे खूप गंभीर आणि वेदनादायक प्रतिक्रिया होऊ शकते.

पाच वर्षाखालील ५% मुलांमध्ये अॅलर्जी असल्याचे दिसते. १९९७ ते २००७ दरम्यान १८ वर्षांखालील मुलांमध्ये फूड अॅलर्जीचे प्रमाण १८%ने वाढल्याची नोंद आहे.

मासे, शेलफिश, नट्स आणि शेंगदाणे यांच्या अॅलर्जीवर बहुतांशी मुले मात करू शकत नाहीत, उलट आयुष्यभर त्यांना ही अॅलर्जी राहते. असे आढळून आले आहे की प्रत्येक मुलात वेगवेगळी लक्षणे असतात.

राष्ट्रीय अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेनुसार, ज्यांना खूप तीव्र अॅलर्जी असते, त्यांनी अगदी थोडासा खाद्यपदार्थ खाल्ला तरी त्यांना अॅलर्जी होऊ शकते.

उपचार आणि देखभाल

सामान्यपणे फूड अॅलर्जीचा प्रतिबंध किंवा उपचार औषधांनी केला जात नाही. ज्या पदार्थांमुळे लक्षणे दिसतात, ते पदार्थ टाळणे हाच उपचाराचा मुख्य उद्देश असतो. हे खाद्य पदार्थ आणि त्याच अन्न समूहातील इतर तत्सम अन्नपदार्थ टाळणे हेच महत्त्वाचे असते.

ज्या महिला आपल्या मुलांना स्तनपान देत असतात, त्यांनी असे खाद्य पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे, तुम्ही तो पदार्थ थोडा जरी खाल्ला तरी तुमच्या दुधावाटे बाळामध्ये त्याची अॅलर्जिक प्रतिक्रिया दिसू शकते.

डॉक्टर एपिनेफ्रिनची किट तुम्हाला देऊ शकतात. हे औषध तीव्र फूड अॅलर्जी झाल्यास तीव्र प्रतिक्रियेची लक्षणे थांबवू शकते.

तीन ते सहा महिन्यांनंतर, तोच पदार्थ मुलांना देऊन बघितला तर त्या अॅलर्जीवर त्यांनी मात केली आहे का ते कळू शकते. मूल तीन ते चार वर्षांचे झाल्यावर ते अन्न कदाचित त्यांचे शरीर सोसू शकते. अशा प्रकारे लहानपणीच्या अनेक अॅलर्जी तात्पुरत्या असतात.

सामान्यतः लहान मुले आणि अर्भकांमध्ये दूध आणि सोयाची अॅलर्जी असल्याचे दिसून येते. ही लक्षणे अशी असू शकतात :

• चिडचिड (किरकिर करणारे मूल)

• मुलाच्या विष्ठेमध्ये रक्त.

• वाढ व्यवस्थित न होणे.

नवजात शिशुमध्ये दिसणारी अॅलर्जी जरी टाळता येणे शक्य नसले, तरी काही प्रतिबंधात्मक उपाय करून तिची वारंवारता कमी करता येऊ शकते.

• शक्य असल्यास पहिले सहा महिने आपल्या बाळाला स्तनपान द्या. बाळ किमान सहा महिन्यांचे होईपर्यंत त्याला घन (सॉलिड) आहार देऊ नका.

• मूल एक वर्षाचे होईपर्यंत गाईचे दूध, गहू, अंडी, शेंगदाणे आणि सीफूड पासून दूर ठेवा.

फूड अॅलर्जीचे व्यवस्थापन कसे करावे ?

• रेस्टॉरंटमध्ये जेवताना आपण जे पदार्थ खातो, त्यात काय काय घटक पदार्थ आहेत हे जाणून घ्या. शक्य असेल तेव्हा रेस्टॉरंटमधून मेनू कार्ड आधीच घेऊन ठेवा आणि तेथे काय काय मिळते हे नीट तपासा.

• जेवण वाढणारा असेल, त्याला आपल्या मुलाच्या फूड अॅलर्जीबद्दल अवश्य सांगा. त्याला प्रत्येक डिश कशी बनवतात व त्यात काय काय घटक पदार्थ असतात हे माहीत असते. ऑर्डर करण्यापूर्वी डिश बनवण्याची रीत आणि त्यातील घटक पदार्थ याविषयी जरूर विचारा.

• बुफे पद्धतीचे किंवा एकाच ताटातून अनेकांनी वाढून घेण्याची, जेवण्याची पद्धत टाळा कारण, अनेक जेवणांसाठी तीच तीच भांडी वापरल्याने अन्न दूषित होण्याची शक्यता असते.

• तळलेले पदार्थ खाण्याचे टाळा कारण एकाच तेलात वेगवेगळे पदार्थ तळलेले असू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT