Liver Disease
Liver Disease  google
आरोग्य

Liver Disease : यकृताच्या आजाराचा शेवटचा टप्पा असतो अतिगंभीर; अशी आहेत लक्षणे

नमिता धुरी

मुंबई : यकृताच्या अकार्यक्षमतेचे चार टप्पे असून त्यात सूज येण्यापासून ते शेवटच्या टप्प्यातील यकृत रोगाचा (ESLD) समावेश आहे. जळजळ किंवा यकृताचे नुकसान करणारे कोणतेही विकार यकृत रोग म्हणून ओळखले जातात.

यकृताचा आजार टप्प्याटप्प्याने वाढत जातो आणि परिणामी यकृतावर याचे गंभीर परिणाम व्हायला लागतात. या प्रत्येक टप्प्यामध्ये यकृताच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होत जातो. यकृताच्या आजाराविषयी सविस्तर माहिती देत आहेत ग्लोबल रुग्णालयाच्या यकृत, स्वादुपिंड, आतडे प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया विभागाचे संचालक डॉ. गौरव चौबल. हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

यकृताच्या आजाराचे चार टप्पे

• दाह आणि सूज

• फायब्रोसिस

• सिरोसिस

• शेवटच्या टप्प्यातील यकृताचा आजार (ESLD)

हिपॅटायटीस सी विषाणू यकृताला हळूहळू इजा करते आणि याची सुरुवात बहुतांश वेळा इन्फ्लेमेशनने (सिरॉसिस) होते यकृताच्या आजारांची लक्षणे काही जणांमध्ये मध्यम तर काही जणांमध्ये कितीतरी वर्षे किंवा दशके सिरोसिस होण्याआधीच काहीच दिसून येत नाहीत. परंतु शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या हिपॅटायटीस सी मुळे यकृतावर गंभीर परिणाम झालेले असतात.

शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजारामध्ये तीव्र स्वरुपाचा सिरोसिस, हिपेटाईटिस सी मुळे यकृत निकामी होणे अशा विविध आजारांचा समावेश होतो. या टप्प्यावर यकृताची कार्य करण्याची क्षमतेवर गंभीर परिणाम झालेला असतो.

हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी आणि पोटामध्ये पाणी जमा होणे असे काही परिणाम या आजारामध्ये दिसून येतात. यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराकरिता उपलब्ध आहे.

शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजार झाल्यास यकृत प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता भासू शकते. प्रत्यारोपणादरम्यान निकामी झालेल्या यकृताच्या जागी निरोगी दात्याने दान केलेले यकृताचे प्रत्यारोपण केले जाते.

सिरोसिसचे उपचारामध्ये आजाराची तीव्रता वाढू नये यावर भर दिलेला असतो. यामुळे आजाराची तीव्रता कमी होते किंवा त्यामुळे होणारी हानी कमी करण्यास मदत होते.

शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराची लक्षणे

• जखम किंवा रक्तस्राव

• त्वचा किंवा डोळे पिवळसर होणे (कावीळ)

• तीव्र खाज येणे

• वेदना होणे (कळ येणे)

• भूक मंदावणे

• मळमळ होणे

• तुमच्या पाय आणि ओटीपोटात द्रव साठल्यामुळे सूज येणे

• स्मरणशक्ती किंवा लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचण येणे

सिरोसिसची तीव्रता वाढत गेल्यास यकृत निकामी होते आणि कार्यक्षम राहत नाही. ज्यांना सिरोसिस आहे त्यांना पुढील लक्षणे दिसू शकतात. अन्ननलिकेला सूज आल्यामुळे जठर आणि आतड्यांमध्ये रक्तस्राव होणे, हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी म्हणजेच रक्तामध्ये विषारी पदार्थाच्या संचयामुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवरही परिणाम होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT