Over Training Syndrome
Over Training Syndrome google
आरोग्य

Over Training Syndrome : अतिव्यायामामुळे शरीरावर होऊ शकतात हे घातक परिणाम

नमिता धुरी

मुंबई : जिममधील वर्कआऊट आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर आहे. परंतु वर्कआऊट योग्यरितीने न केल्यास शरीरासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. वर्कआऊट करताना जर ही पुढील सहा लक्षणे जाणवत असल्यास आपण व्यायाम किंवा वर्कआऊट चुकीच्या पद्धतीने करत आहोत हे लक्षात घ्यावे.

ओवर ट्रेनिंग सिन्ड्रोमची (ओटीएस) ही लक्षणे असून यामध्ये योग्य सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. याविषयी सांगत आहेत मेडिकव्हर हॉस्पिटलचे कन्स्लटंट इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनुप महाजनी. हेही वाचा - इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

१. स्नायूंमध्ये असह्य वेदना

जिम किंवा व्यायाम सुरु केल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये स्नायूंमध्ये वेदना सुरु होतात. परंतु आठवड्यानंतरही या वेदना होत असतील किंवा स्नायूमध्ये छोटी किंवा मोठी जखम झाली असेल तर याचा अर्थ तुम्ही चुकीच्या पद्धतीने व्यायाम करत आहात.

शरीरावर आवश्यकतेपेक्षा ताण दिल्यासही स्नायूमध्ये वेदना सुरु होतात. काही वेळेस या वेदना बराच काळ राहतात, हे देखील अतिरिक्त व्यायाम करण्याचे एक लक्षण आहे. शरीराला सहन होणार नाही एवढे वजन उचलल्यास देखील वेदना होऊ शकतात.

२. खूप थकवा येणे आणि उपाशी पोटी व्यायाम करणे

जिम किंवा वर्कआऊट केल्यानंतर थोडा वेळ थकवा जाणवतो. परंतु बहुतांश वेळा व्यायाम केल्यानंतर तीन ते पाच मिनिटांमध्येच हा थकवा निघून जातो. परंतु व्यायाम केल्यानंतरही बराच काळ थकवा जाणवत असेल तर याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

बहुतांश जण उपाशी पोटी जिम करतात. हे शरीरासाठी घातक आहे. जिम करण्यासाठी शरीरामध्ये उर्जा असणे गरजेचे असते. यासाठी उपाशी पोटी जिम करू नये. थोडा हलका आहार घेणे आवश्यक आहे.

३. अस्वस्थता आणि चिडचिडेपणा वाढणे

जिम किंवा व्यायाम केल्यानंतर शरीर हलके वाटते आणि मन देखील प्रसन्न होते. परंतु काही व्यक्तींमध्ये जिम केल्यानंतर चिडचिडेपणा वाढतो. आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करण्याचे हे देखील एक लक्षण आहे.

अतिरिक्त व्यायाम केल्याने शरीरातील हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे मूड सारखे बदलणे, मन एकाग्र करू न शकणे, अस्वस्थ वाटणे, उत्साह कमी होणे ही लक्षणे दिसून येतात. कधीकधी यामुळे नैराश्यदेखील येऊ शकते.

४. शरीरावर अतिरिक्त व्यायामासाठी दबाव टाकणे

जिममध्ये गेल्यावर दिवसेंदिवेस जास्तीत जास्त व्यायाम करण्याचा भार काही जण घेतात. जास्तीत जास्त व्यायाम करण्यासाठी शरीरावर दबाव टाकला जातो. याचा शरीरावर परिणाम होतोच शिवाय तुमच्या कामावरही याचा परिणाम व्हायला लागतो. यामुळे मग जिममध्येही तुम्ही चांगल्यारितीने व्यायाम करू शकत नाही.

५. झोपेवर परिणाम होणे

आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम केल्याचा परिणाम काही जणांमध्ये झोपेवरही होत असतो. शरीरावरील ताण वाढल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्सचे संतुलनही बिघडते. ज्यामुळे झोप नीट लागत नाही.

याचा दुसरा परिणाम शरीरावरही होतो. थकलेल्या शरीराला आरामाची गरज असते. परंतु झोप चांगल्यारितीने पूर्ण न झाल्याने आणखीनच थकवा जाणवायला लागतो.

६. वजन वाढणे

जिममध्ये वर्कआऊट केल्यावर वजन कमी होण्याऐवजी काही व्यक्तींमध्ये वजन वाढल्याचे दिसून येते. दोन व्यायामांच्या मधल्या काळात आवश्यक विश्रांती न घेतल्यामुळे हे होते. जिममधून एकदाही सुट्टी न घेणे हे ही याचे एक कारण असू शकते.

आवश्यक विश्रांती न मिळाल्याचा परिणाम पुरुषांमध्ये टेस्टोरॉन्सच्या पातळीवर होतो. शरीरामध्ये कॉर्टिसोल हार्मोन्सचे प्रमाणही वाढते. यामुळे देखील वजन वाढण्याची शक्यता असते.

आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास ही ओवर ट्रेनिंग सिन्ड्रोमची लक्षणे जाणवू शकतात.

ओटीएसपासून वाचण्यासाठी काय कराल ?

व्यायामामुळे शरीराला नुकसान पोहोचू नये किंवा ओटीएसपासून वाचण्यासाठी आवश्यक डाएट म्हणजेच आहार ठेवणे गरजेचे आहे. जिमला जाण्यापूर्वी कार्बोहायड्रेट आणि एनर्जी मिळण्यासाठी थोड्या प्रमाणात खाणे गरजेचे आहे.

वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी जिम करणे शरीरासाठी घातक ठरू शकते. जिमला जाण्यापूर्वी दोन केळी खाल्ली तरी त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. जिम किंवा वर्कआऊट सुरू करण्यापूर्वी आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

जिममध्ये देखील एकदम व्यायाम सुरु करण्यापूर्वी जिम इन्स्ट्रक्टंरच्या सल्ल्याने व्यायामास सुरुवात करावी. वजन कमी करण्यासाठी घाई करू नका. टप्प्याटप्प्याने व्यायाम केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरेल.

मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब इत्यादी आजार असलेल्या व्यक्तींनी जिम सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. घरामध्ये हे आजार असल्यास देखील व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. जिम किंवा वर्कआऊट करणे चांगलेच पण योग्यरितीने करणे उत्तम !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT