मुलं इंजेक्शनला घाबरतात?
मुलं इंजेक्शनला घाबरतात? Esakal
आरोग्य

लहान मुलांच्या मनामधून अशी दूर करा इंजेक्शनची भिती, पुन्हा Injection पाहून कधीच रडणार नाहीत

Kirti Wadkar

इंजेक्शन म्हंटलं की मोठ्यांना देखील अनेकदा घाम फुटतो. लहान मुलं तर इंजेक्शनचं नाव एकताच रडू लागतात. यासाठी अनेकदा पालक मुलांचा हट्ट मोडण्यासाठी किंवा त्यांना धाक दाखवण्यासाठी, त्यांच्या मस्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इंजेक्शन Injection देण्याची भिती दाखवतात. Take away the fear of injection from your child

लहान मुलांच्या Kids त्वचेसोबतच त्यांच मनही अत्यंत नाजूक असतं. अशात इंजेक्शन घेताना झालेल्या वेदना Pains त्यांच्या मनावर परिणाम करतात. इंजेक्शनच काय तर दवाखाना किंवा डॉक्टर Doctor या शब्दाची त्यांच्या मनात भिती निर्माण होते. 

मुलांच्या मनातून इंजेक्शन किंवा डॉक्टरांच्याविषयी असेली भिती दूर करणं गरजेचं आहे. यासाठी पालकांनी Parents मुलाच्या मनातील ही भिती दूर करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलांची ही भिती कशी दूर करावी याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मुलाशी खोटं बोलू नका- मुलांना इंजेक्शनची भिती वाटतं असल्याने अनेक पालक त्यांना फसवून दवाखान्यात नेतात. तसचं इंजेक्शन दुखणार नाही असं सांगतात. मात्र इंजेक्शन दिल्यानंतर वेदना झाल्यानंतर मुलांनाही तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलल्याचं लक्षात येतं. यामुळे त्यापुढे ते कदाचित तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

मुलांनाशी खरं बोला. इंजेक्शनमुळे वेदना होतील मात्र त्या काही वेळापुरती असतील हे त्यांना सांगा. तसचं इंजेक्शन किंवा लस घेतल्यानंतर कसं त्यांचं आजारापासून संरक्षण होईल. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल याचं महत्व त्यांना पटवून द्या. 

हे देखिल वाचा-

मुलांना द्या बक्षिस- लस दिल्यानंतर मुलांना त्याना ते खूप स्ट्राँग असल्याचं म्हणत त्यांच्या आवडीचं एखादं चॉकलेट किंवा खेळणं घेऊन द्या. ही वस्तू देताना ते त्याच्या धाडसासाठी दिलं जात असल्याचं त्याला सांगा. यामुळे कदाचित पुढच्या वेळी तो इंजेक्शनसाठी घाबरणार नाही. 

मुलांचं मन रमवा- दवाखान्यात नेत असतानाच मुलांना त्यांच्या आवडीच्या किंवा इतर काही गोष्टी सांगायला सुरुवात करा. म्हणजे आधीपासूनच मुलं रडू लागणार नाहीत. तसचं तुम्ही सोबत त्याचं एखादं आवडतं खेळणं नेऊ शकता. इंजेक्शन देते वेळी या खेळण्यासोबत खेळत असताना कदाचित त्याचं मन भरकटेल आणि तो जास्त रडणार नाही.

कम्फर्टेबल करा- मुलांना दवाखान्यात नेल्यावर आधी त्याला तिथं अॅडजस्ट होवू द्या. साधारण लहान मुलांच्या दवाखान्यात खेळणी किंवा भिंतीवर रंगीत चित्र असतात. ही चित्र दाखवून आधी त्यांना रमू द्या. त्यानंतर डॉक्टरांच्या केबिनमध्येही त्यांचे जबरदस्ती हात पाय पकडून ठेवण्यापेक्षा ते कम्फर्टेबल असतील याकडे लक्ष द्या. तुम्ही मुलाला उचलून घेऊन किंवा मांडीत बसवूनही इंजेक्शन देण्यास सागू शकता. 

अनेकदा मुलांना जबरदस्ती पकडून ठेवल्याने ते अधिक घाबरतात. काही वेळेला ते हालचाल करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांना अधिक वेदना होवू शकतात. 

पालकांनी खंबीर राहणं गरजेचं- अनेकदा लसीकरणापूर्वी मुलांचे आई-वडील स्वत: जास्त घाबरतात आणि चिंतेंत असतात. लक्षात घ्या मुलं ही आपल्या आई-वडिलांचं अनुकरण करत असतात. तुम्हीत घाबरलात तर मुलं आधीच रडायला सुरुवात करेल. त्यामुळे हसत त्यांच्याशी गप्पा मारा यामुळे त्यांच्या मनातील इंजेक्शनची भिती कमी होईल. 

हा सोबत मुलांना इतरवेळी इंजेक्शन देण्याची भिती सतत दाखवू नका. अन्यथा कायमच त्यांच्या मनात इंजेक्शनबद्दल भिती निर्माण होईल आणि दवाखान्याचं नाव घेताच ते रडू लागतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT