Diabetes Patient Health Care  esakal
आरोग्य

Diabetes Control Tips: या समस्या येताच समजावे मधुमेह गंभीर स्तराला जाऊन पोहोचलाय, वेळीच व्हा सावध नाहीतर...

फार तहान लागणे, सतत लघवीला जाणे, थकवा, डोळ्यांनी कमी दिसणे ही सगळी लक्षणे मधुमेह असल्याचे दर्शवते

सकाळ ऑनलाईन टीम

Diabetes Control Tips : मधुमेहाचा आजार हा असा आजार आहे जो कधीही बरा होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला नियंत्रित कसे ठेवता येईल याचा विचार करावा लागतो.

फार तहान लागणे, सतत लघवीला जाणे, थकवा, डोळ्यांनी कमी दिसणे ही सगळी लक्षणे मधुमेह असल्याचे दर्शवते. मात्र हा आजार गंभीर स्तराला जाऊन पोहोचला हे कसे समजावे?

सामान्यत: 140 mg/dL (7.8mmol/L) पेक्षा कमी ब्लड शुगरची लेव्हल सामान्य मानली जाते. मात्र ही लेव्हल 200 mg/dl पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ तुमची शुगर लेव्हल वाढली आहे. आणि ही लेव्हल 3oo mg/dl पेक्षा वर गेल्यास धोकादायक ठरू शकते. तेव्हा लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डोळ्यांमधील हे बदल दर्शवतात मधुमेहाची लक्षणं

ब्लड शुगर लेव्हल वाढल्यानंतर डोळ्यांच्या रेटिनाच्या रक्तवाहिन्या प्रभावित होतात. त्यामुळे डोळे कमकुवत होणे, धुसर दिसणे, मोतियाबिंदू, ग्लूकोमा आणि सगळ्यात अधिक डायबिटिक रेटिनोपॅथीच्या समस्या वाढतात. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर तुमच्या डोळ्याचा प्रकाशही जाण्याची शक्यता आहे.

Diabetes Control Tips

पायांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांकडे विशेष लक्ष द्या

मधुमेह तुमच्या पायांना दोन प्रकारे प्रभावित करू शकते. पहिलं नर्व डॅमेज आणि दुसरं ब्लड सर्क्युलेशन असुरळीत होणे. अशा स्थितीत जखम सुद्धा लवकर बरी होत नाही. अशात तुम्ही योग्य वेळी उपचार केले नाहीत तर तुम्हाला तुमच्या अंगांना सुद्धा गमवावं लागू शकतं. (Health News)

मधुमेहाचा किडनीवरही होतो प्रभाव

किडनी तुमच्या वेस्ट मटेरियला शरीरापासून वेगळं काढते. मात्र हाय ब्लड शुगर तुम्हाला गंभीररित्या आजारी पडण्यास कारणीभूत ठरू शकते. व्यक्तीस वारंवार लघवी येणे, पाय. टाच आणि हात आणि डोळ्यांना सुजण येणे, उलट्या येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

हृदय आणि ब्लड वेसल्सवरही पडतो प्रभाव

मधुमेहाच्या रूग्णांना काय हृदयविकाराचा धोका असतो. स्ट्रोकचा देखील धोका वाढतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशननुसार, मधुमेहाच्या रूग्णांना अनेक आजारांचा धोका असतो.

मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. नाहीतर तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गणित बदलणार, सर्वोच्च न्यायालयाने चक्राकार पद्धतीसाठीची याचिका फेटाळली

Shiv Sena Party Symbol Hearing : निवडणुका तोंडावर आणि पुन्हा मिळाली पुढची तारीख, शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवेळी नेमकं काय घडलं ?

Latest Marathi News Live Update : पूरग्रस्तांना भरघोस मदतीसाठी ठाण्यात ठाकरे गटाचे आंदोलन

3 Ingredient Kaju Katli for Diwali: यंदाची दिवाळी साजरी करा हेल्दी पद्धतीने; घरीच बनवा फक्त ३ पदार्थांपासून काजू कतली

High Court Recruitment 2025: उच्च न्यायालयात कोर्ट मॅनेजर होण्याची संधी! 56,100 रुपये बेसिक पगार, आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT