Children Health esakal
आरोग्य

Children Health : लहान मुलांच्या 'या' चुकीच्या सवयी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक, वेळीच द्या लक्ष !

Children Health : मुलांच्या चुकीच्या सवयींचा मुखावरच नाही, तर आरोग्यावर आणि दिसण्यावरदेखील परिणाम होतो.

सकाळ वृत्तसेवा

Children Health : लहान मुलांमध्ये काही सवयी लहान वयात सामान्य विकासाचा भाग म्हणूनच दिसतात. ज्या तात्पुरत्या असून वेळेसोबत नाहीशा होतात. जर या सवयी सुरूच राहिल्या, तर मुख व दातांचे आरोग्य बिघडू शकते. जसे अंगठा चोखण्याची सवय असल्यास र, त, द शब्दांचा उच्चार बिघडू शकतात.

तीन वर्षांनंतरही बाळाचे अंगठा चोखणे सुरूच असेल, तर त्याच्या दातांवर परिणाम होतो. दात पुढे येण्याचा मोठा धोका असतो. दुधाचे दात पडल्यावर पक्के दात येताना दातासह हनुवटीचा आकार बिघडण्याची शक्यता असते.

चुकीच्या सवयीचा मुखावरच नाही, तर आरोग्यावरच व दिसण्यावरदेखील परिणाम होतो. पुढे त्यांच्या मानसिकतेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा सवयीच्या उपचारासाठी पालकांच्या सहकार्याची व मुलांच्या योग्य समुपदेशनाची गरज असते.

बऱ्याचदा या सवयीमागचे कारण हे मुलांमध्ये असलेली भीती किंवा तणाव असू शकते. यासाठी दंतवैद्यक यांच्याकडून उपचार घेणे गरजेचे आहे. विविध प्रकारच्या उपकरणांद्वारे जसे दातांना पिन लावणे, मुलांना मार्गदर्शन करणे अशा साह्यातून दंतवैद्यक निश्चितच या सवयी सोडविण्यासाठी मदत करत असतात.

मुलांच्या या सवयी घातक

  • अंगठा चोखणे

  • दातांनी नख तोडणे

  • सतत ओठ चावणे

  • तोंडाने श्वास घेणे

विविध सवयींचे दुष्परिणाम

  • श्वासाची दुर्गंधी होणे. जीभ दाबल्याने तोंड कोरडे होऊ शकते.

  • दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होणे.

  • बोलताना जीभ बाहेर काढणे.

  • काही शब्द तोंडातल्या तोंडात बोलत असल्याचे दिसून येते.

  • तोंडाच्या आसपासच्या उतींना मोठी हानी पोचते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT