आरोग्य

Garlic Health Tips : काय सांगताय? लसणाचे एवढे प्रकार आहेत?

लसणाचा वापर जवळपास सर्व पदार्थांमध्ये केला जातो

सकाळ वृत्तसेवा

सर्दी खोकला झाला तरी डॉक्टर आपल्याला सांगतात की, सकस आहार घ्या. जास्त तेलकट, मसालेदार अन्न खाऊ नका. कारण, बरे हाण्यासाठी औषधाबरोबरच योग्य पौष्टीक आहार करणे गरजेचे आहे. हजारो वर्षांपासून आपल्या भारतात लसणाचा उपयोग जेवणात केला जातो. अनेक भाज्यांमध्ये, पदार्थांमध्ये लसणाची फोडणी दिली जाते.

लसणाचा वापर जवळपास सर्व पदार्थांमध्ये केला जातो. त्याची चव आणि सुगंध दोन्ही खूप उग्र आहेत. हे जेवणाला एक वेगळीच चव आणते. म्हणून बहुतेक लोक प्रत्येक पदार्थात लसणाचा वापर करतात. आयुर्वेदातही लसणाचा वापर केला जातो. लसणाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तसेच, त्याचे अनेक प्रकारही आहेत. यातील कोणत्या प्रकारचा लसूण खाण्यासाठी योग्य आहे. त्याचे गुणधर्म कोणते हे पाहुयात.

पांढरा लसूण

हा लसणाचा सामान्य प्रकार असून तो बाजारात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. या लसणाच्या पाकळ्या बारिक मोठ्या असतात. या लसणाचे देठ मऊ असतात. त्यामुळे हा लसूण धाग्यात ओवूनही विकला जातो.

जांभळा लसूण

केवळ पांढऱ्या रंगाचा लसूण पाहिलेल्या लोकांना हे ऐकूण आश्चर्य वाटेल की, लसूण जांभळ्या रंगाचाही असतो. जांभळ्या रंगाच्या लसणाची साल जांभळा रंगाची असते. आतील पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. या लसणाच्या मध्यभागी असलेला देठ कडक असतो. याच्या पाकळ्या आकाराने मोठ्या असून त्यामध्ये जास्त रस असतो. क्वचितच हा लसूण बाजारात पहायला मिळतो.

लसणाचा हा एक वेगळा प्रकार असून त्यामधील पाकळ्या या काळ्या रंगाच्या असतात. आपल्या घरातील साधा लसूण काही आठवडे गेल्यानंतर तो काळा होऊ लागतो. खायला सॉफ्ट असलेला हा लसूण नेहमी आद्रता असलेल्या ठिकाणी ठेवावा लागतो.

देशी लसूण

या लसणाला गावठी, देशी लसूण असेही म्हणतात. याच्या पाकळ्या फिकट गुलाबी रंगाच्या असतात. आकाराने हा लहान असतो. हा लसूण चवीला अधिक गोड असतो. गुलाबी लसूण उष्ण आणि अत्यंत तिखट म्हणून ओळखला जातो. या लसणात जीवनसत्त्वे अ, ब, क आणि कॉपर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅश असतात.

खाण्यासाठी कोणता लसूण योग्य

लसणाचे सर्व प्रकार आरोग्यासाठी लाभदायक आहेत. त्यामुळे रंगाचा विचार करू नका. पण, तुलनेत जांभळा लसूण काण्यासाठी योग्य आहे. त्याची चव अधिक तीव्र नाही. म्हणून तो रोजच्या जेवणात समाविष्ट केला तर चांगलेच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT