रक्तातल्या साखरेचं नियंत्रण Esakal
आरोग्य

आयुर्वेदानुसार या पदार्थांमुळे Blood Sugar राहील नियंत्रणात, मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात करा सहभाग

ज्यांना आधीपासूनच मधुमेह आणि किंवा ज्यांना मधुमेहाची लक्षणं दिसू लागली आहेत, त्यांनी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये Ayurveda अशा काही पदार्थांचा उल्लेख करण्यात आलाय ज्यामुळे रक्तातील साखर नियंणात राखणं शक्य आहे

Kirti Wadkar

मधुमेह ही सध्याच्या काळात एक वाढत जाणारी समस्या ठरू लागली आहे. बदललेली जीवनशैली, तणाव, चुकीच्या आहार पद्धती तर काही वेळेस अनुवांशिक कारणामुळे मधुमेह Diabetes होवू शकतो. Try these food substances to control your blood sugar

चिंतेची बाब म्हणजे अद्यापही मधुमेहावर Diabetes कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. केवळ योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत Lifestyle योग्य ते बदल करून मधुमेह नियंत्रणात ठेवणं शक्य आहे.

मधुमेहामध्ये ब्लड शुगर म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखणं गरजेचं असतं अन्यथा हृदय रोग, किडनी, लिव्हर आणि डोळ्यांवरही गंभीर परिणाम होवू शकतो.

अलिकडे तर कमी वयात किंवा अगदी लहान मुलांमध्ये देखील टाइप-२ डायबिटीजचा धोका वाढू लागला आहे.

यासाठीच ज्यांना आधीपासूनच मधुमेह आणि किंवा ज्यांना मधुमेहाची लक्षणं दिसू लागली आहेत, त्यांनी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये Ayurveda अशा काही पदार्थांचा उल्लेख करण्यात आलाय ज्यामुळे रक्तातील साखर नियंणात राखणं शक्य आहे.

अगदी मेडिकल सायन्सने देखील हे पदार्थ बल्ड शुगर नियंत्रणात राखण्यास फायदेशीर असल्याच मानलं आहे.

हे देखिल वाचा-

गिलोय किंवा गुळवेल

गुळवेल ही एक औषधी वनस्पती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुळवेल विविध आजारांवर उपाय म्हणून वापरण्यात येते. गुळवेलीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच बल्ड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

गुळवेलीच्या सेवनामुळे इन्शुलिनची पातळी नियंत्रणात राखण्यास तसचं रक्तातील साखर नियंत्रणात राखण्यास मदत होत असल्यास अनेक प्रयोगांमधून सिद्ध झालं आहे. तसचं गुळवेलीच्या पानांचं चूर्ण टाइप-२ डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतं.

जांभूळ

जांभळाचं फळच नव्हे तर बिया देखील मधुमेह नियंत्रणात राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. जांभळामध्ये असलेल्या हायपोग्लासेमिक गुणधर्मामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसंच जांभळामध्ये एंथोसायनि, एलाजिक ऍसिड आणि पॉलिफेनोल्स सारखे बायोएक्टिव संयुगं आढळतात ज्याचा इन्शुलिनवर प्रभाव पडतो. तसंच मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.

आवळा

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत होण्यासोबतच ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्याने स्वादुपिंडाचं कार्य सुधारण्यास आणि इन्शुलिनचा स्राव वाढविण्यास मदत होते.

अभ्यासानुसार मधुमेहामध्ये होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दाह कमी करण्यासाठी देखील आवळ्याचं सेवन उपयुक्त ठरतं. यासाठी मधुमेह असलेले रुग्ण नियमितपणे आवळ्याच्या ज्यूसचं किंवा आवळा चूर्णाचं सेवन करू शकतात.

कारलं

भारतामध्ये अनेक घरांमध्ये कारल्याची विविध प्रकारची भाजी बनवली जाते. हेच कार्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मधुमेही रुग्णांसाठी तर हा एक भाजीचा उत्तम पर्याय आहे. कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड-पी नावाचं इन्सुलिनसारखे संयुग आढळतं. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते.

आयुर्वेदामध्ये देखील कारल्याच मधुमेह रोधी गुणधर्म असल्याचं सांगण्यात आलंय. यासाठीच मधुमेह असलेल्या रुग्णानी आहारामध्ये नियमितपणे कारल्याच्या भाजीचं सेवन करावं तसंच कारल्याचा ज्यूस देखील ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरतो.

अशा प्रकारे अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या या पदार्थांच्या सेवनामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राखणं सहज शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Case : अयानने रिल्ससाठी वापरलेल्या दोन पिस्टल नेमक्या कुणाच्या? समोर आली धक्कादायक माहिती...

Pune Fraud News : विवाहविषयक संकेतस्थळावर तोतया शास्त्रज्ञाकडून महिलेची फसवणूक

Pune Rain News : उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; शहरात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागांत गारपीट

LSG vs RR Live: रिषभ पंत धडपडला... दोन्ही फलंदाज एकाच दिशेला.. चूक अन् राजस्थानला डोकं वर काढण्याची मिळाली संधी Video

Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

SCROLL FOR NEXT