Head And Neck Cancer Symptoms sakal
आरोग्य

Head And Neck Cancer Symptoms: तुम्हाला अचानक मानेत गाठ जाणवत आहे? दुर्लक्ष करू नका! असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण

What Are The Symptoms Of Head And Neck Cancer: गळ्यात गाठ येणे, घसा सतत खवखवणे किंवा गिळताना त्रास होणे ही डोके आणि मान कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी काही असू शकतात.

Anushka Tapshalkar

These Unusual Signs Could Be The Signalling Head And Neck Cancer: आपल्या शरीरात कोणताही आजार निर्माण होण्यापूर्वी तो काही लक्षणांद्वारे इशारे देत असतो. मग डोकं आणि मानेचा कर्करोगही याला अपवाद नाही. सुरुवातीला किरकोळ वाटणारी काही लक्षणे वेळेवर ओलक्जली नाही तर गंभीर समस्यांना टाळता येऊ शकते. सतत घसा खवखवणे, गिळताना त्रास होणे, तोंडात झालेली जखम बरी न होणे किंवा अचानक वजन कमी होणे; यासारखी लक्षणे दिसू लागली तर ती दुर्लक्ष कारण्यासारखी नाहीत. ही लक्षणे वेळीच ओळखली, तर कर्करोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. चला तर मग जाणून घेऊया मान आणि डोक्याच्या कर्करोगाच्या लक्षणांविषयीची सविस्तर माहिती.

सतत घसा खवखवणे आणि आवाज बदलणे

अधूनमधून घसा खवखवणे सामान्य असते, पण दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ घसा खवखवत असेल किंवा आवाजात बदल जाणवत असेल, विशेषतः आवाज घोगरा होणे हे लॅरिंजियल किंवा घशातील कर्करोगाचे लक्षण असू शकते, खासकरून गिळताना त्रास होत असेल तर.

गळ्यात, मानेत गाठ किंवा सूज येणे

जर तुमच्या गळ्यात, मानेच्या बाजूस अचानक गाठ किंवा सूज जाणवायला लागली, तर ते दुर्लक्षित करू नका. ही गाठ सामान्य संसर्गामुळेही येऊ शकते, पण त्यावर कोणतेही उपाय करून ती बरी होत नसेल आणि हळूहळू वाढत असेल, तर त्वरित डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा ही गाठ लसीका ग्रंथींमध्ये (Lymph Glands), कर्करोगाच्या पेशींमुळे(Cancer Cells) तयार होतात. त्यामुळे सुरुवातीलाच तपासणी करून योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

गिळण्यास त्रास होणे किंवा असह्य कानदुखी

खोकला झाला असताना, थंडपेय प्यायल्यामुळे, किंवा टॉन्सिल्सचा त्रास होता असताना अन्न गिळायला त्रास होणे सामान्य आहे. परंतु या कारणाशिवाय तुम्हाला रोज अन्न गिळताना अडथळा येत असेल (Dysphagia - डिस्फेजिया), तर हे घसा किंवा अन्ननलिकेतील ट्यूमरचे लक्षण असू शकते. तसेच कानात कोणत्याही संसर्गाशिवाय सातत्याने वेदना जाणवणे आणि बधिरता किंवा कानात आवाज येणे हे नासोफॅरिंजियल कर्करोगाचे संकेत असू शकतात. वेळेवर ही लक्षणे लक्षात घेऊन योग्य उपचार करता येतात.

सतत तोंड येणे किंवा जखमा होणे

सर्वसाधारणपणे तोंड आले की ते एक-दोन आठवड्यांनंतर बरे होतात, पण जर तोंड आल्यामुळे किंवा त्या फोंडामुळे झालेली जखम जास्त काळ टिकून राहत असेल आणि बरी होत नसेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.या प्रकारच्या जखमा जिभेवर, हिरड्यांवर किंवा तोंडाच्या आतील भागावर होऊ शकतात आणि त्या तोंडाच्या कर्करोगाचे संकेत असू शकतात.

आवाजात बदल किंवा सतत खोकला

आपल्या आवाजात आयुष्यातील काही ठराविक टप्प्यात बदल होतात. पण तुम्हाला जर तुमच्या आवाजात सतत बदल होताना प्रकर्षाने जाणवत असेल, जसे की आवाज घोगरा किंवा खरखरीत होणे, हे लॅरिंजियल कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. त्याचबरोबर उपचारांनंतरही बरा न होणारा खोकला घसा किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतो.

विनाकारण व अचानक वजन कमी होणे किंवा थकवा

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि ताणतणावामुळे आपल्या वजनात बदल होऊ शकतात. पण कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन झपाट्याने किम होणे आणि सतत थकवा जाणवणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, ज्यात कर्करोगाचाही समावेश आहे.

त्यामुळे योग्य वेळेतकच आणि सुरुवातीचे निदान करणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण वेळीच उपचार केल्यास आजार नियंत्रणात ठेवता येतो आणि आरोग्य सुधारता येते. तसेच योग्य काळजी घेतली, तर तुमचे जीवनमानही वाढते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT