Weight Loss Spice  esakal
आरोग्य

Weight Loss Spice : चरबी मेणासारखी वितळवायलाच निर्माण झालाय किचनमधील हा पदार्थ; खा आणि बारीक व्हा!

ओवा लठ्ठपणा कमी करण्यास कशी मदत करेल

Pooja Karande-Kadam

Weight Loss Spice : सध्या जागतिक लेव्हलचा प्रश्न वेटलॉस करणं. कारण, वजन तर सुस्साट वेगानं वाढत चाललंय. आणि त्यावर उपायही करता येत नाहीयेत. कारण, लठ्ठपणा ही आजच्या काळातील एक सामान्य समस्या आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी लठ्ठपणाने ग्रस्त असते. शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही लोक जिममध्ये जातात तर काही लोक डायटिंग करतात.

पण तुम्हाला माहित आहे का, की घरगुती उपायांनीही लठ्ठपणा कमी केला जाऊ शकतो. घरातल्या किचनमध्ये असलेल्या एका पदार्थामुळे तुमचे दोन महिन्यात अधिक किलो वजन कमी होऊ शकते. तो कोणता पदार्थ आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहुयात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी ओवा हा असाच एक घरगुती उपाय आहे. जे प्रत्येक स्वयंपाकघरात सहज आढळते. याचा वापर करून तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करू शकता.

लठ्ठपणा कमी करण्यास कशी मदत करेल

औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला ओवा आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. हे वजन कमी करण्यास तसेच पोट आणि पचनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. खरं तर, अजवाइनच्या बियांमध्ये थायमॉल असते जे पचन मजबूत करते आणि पोटात गॅस्ट्रिक रस सोडते.

यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ काढून चयापचय प्रणाली सुधारते. ज्यामुळे आपण खाल्लेले अन्न सहज पचते. यासोबतच शरीरातील अतिरिक्त कॅलरीज नष्ट करून चरबी जमा होण्यापासून बचाव करते.

असे करा ओव्याचे सेवन  

रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा अजवाइन घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका भांड्यात अजवाइनचे पाणी आणि ४-५ तुळशीची पाने टाकून मंद आचेवर उकळून घ्या. थोडा वेळ उकळल्यावर गॅस बंद करून गाळून प्यावा. दररोज रिकाम्या पोटी याचे सेवन करा.

कमी वेळात वजन कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात २५ ग्रॅम अजवाइन टाकून रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी अजवाइनचे पाणी प्यावे. थोड्याच दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT