Weight Loss Tips
Weight Loss Tips esakal
आरोग्य

Weight Loss करायचं असेल तर कॅलरीचा हिशोब ठेवावाच लागेल, आहारात घ्या हे 5 लो कॅलरी फूड्स

सकाळ डिजिटल टीम

Easy Weight Loss Tips : हल्ली ऑनलाइन वर्क, आणि डिजीटलायझेनशनमुळे बहुतांश कामं ही नुसती बसून करण्याचीच आहे. त्यामुळे लठ्ठपणाची समस्याही वाढतच चालली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक हवे ते उपाय करतात. मात्र काहींचे वजन काही केल्या कमी होत नाही. खरं तर वजन आणि कॅलरीजचे डिप कनेक्शन आहे. जेवढ्या जास्त कॅलरीज कंझ्यूम कराल तेवढे वजन वाढतच जाईल. तेव्हा जेवणातच लो कॅलरी फूड खा. म्हणजे वजन आणि कॅलरीचा हिशोब नियंत्रणात राहील.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी खा हे ५ लो कॅलरी फूड्स

दही

दही हा एक चांगला कमी कॅलरी फूड ऑप्शन आहे. हा प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तुम्हाला गोड पदार्थांची क्रेवींग होत असेल तर त्यावरही हे ऑप्शन बेस्ट ठरतं, कारण इतर गोड पदार्थ तुमच्या कॅलरीज वाढवू शकता. चवदार दह्यामध्ये पोषक तत्वे कमी आणि कॅलरीज जास्त असतात. वजन कमी करायचे असेल तर साधे दही खावे.

Weight Loss Tips

अंडी

वजन कमी करण्यासाठी अंड्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. नाश्त्यात अंडी खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात खात नाही आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही उकडलेले अंडे खाऊ शकता किंवा ऑम्लेट किंवा भुर्जी बनवूनही खाऊ शकता. (Diet Plan)

सफरचंद

रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला आजारांपासून दूर राहता येण्यासोबतच वजनही नियंत्रणात ठेवता येते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. 100 ग्रॅम सफरचंदात अंदाजे 50 कॅलरीज असतात. यामध्ये फायबर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामध्ये असलेले पेक्टिन फॅट बर्न करण्यास मदत करते.

ओट्स

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ओट्सचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. अर्धा कप ओट्समध्ये फक्त 154 कॅलरीज आढळतात. यात भरपूर फायबर असते, जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. सकाळच्या नाश्त्यात एक वाटी ओट्स खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. ओट्स अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही त्यात हिरव्या भाज्या घालून शिजवू शकता. (weight loss)

काकडी

उन्हाळ्यात काकडी भरपूर खाल्ली पाहिजे. त्यात भरपूर पाणी असते, त्यामुळे ते डिहायड्रेशन आणि उष्माघातापासून बचाव काकडी तुमचा बचाव करते. काकडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 100 ग्रॅम काकडीत फक्त 16 कॅलरीज असतात. हे खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT