Anger esakal
आरोग्य

Anger : काही लोकांना एवढा राग का येतो माहितीये? असू शकतात ही ३ कारणं

अशा परिस्थितीत परिस्थितीला दोष देण्याऐवजी तुमच्या राग नियंत्रणावर तुम्ही लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो

साक्षी राऊत

Anger : अनेकांना फार तीव्र राग येतो. जर तुम्ही तुमच्या रागावर सकारात्मक पद्धतीने नियंत्रण ठेवले नाही तर ते तुमच्या आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही तर तुमच्या नातेसंबंधावरही त्याचा परिणाम होतो.

प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या कारणांमुळे राग येऊ शकतो. काही लोक वाईट प्रसंगांतून जातात तेव्हा त्यांना राग येतो, तर काहींना भूतकाळातील काही प्रसंगांमुळे किंवा बालपणीच्या अनुभवामुळे राग येतो. अशा परिस्थितीत परिस्थितीला दोष देण्याऐवजी तुमच्या राग नियंत्रणावर तुम्ही लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

कोणत्या कारणांमुळे येतो राग?

बालपण आणि पालकत्व

जर तुमचे बालपण अशा परिस्थितीत गेले असेल ज्यात तुम्ही रागवणे, ओरडणे आणि तीव्र राग अशा परिस्थितींतून गेला असाल तर हे तुमच्या तीव्र रागाचं कारण असू शकतं.

जर तुम्हाला लहानपणी राग व्यक्त करण्याची संधी मिळाली नसेल तर तो राग तुमच्या आत साचून मोठेपणी रागीट स्वभावाचे कारण ठरू शकतो. (Lifestyle)

जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना किंवा वडीलधाऱ्यांना आपापसात भांडताना पाहिले असेल किंवा त्यांचे रागावरील नियंत्रण सुटताना पाहिले असेल, तर हे तुमच्यातील रागाचे कारण असू शकते.

लहानपणी एखाद्या मुलाचे शोषण, गैरवर्तन, भेदभाव किंवा अपमान झाला असेल किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक आघात झाला असेल तर तो मोठा झाल्यावर राग येण्याचे कारण बनते.

वर्तमान परिस्थिती

जर तुम्ही सध्या खूप वाईट परिस्थितीतून जात असाल किंवा तुम्ही खूप तणावाखाली असाल, तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडले असेल किंवा तुम्ही एखाद्या घटनेमुळे नाराज असाल तर ते तुम्हाला आतून तीव्र राग आणण्यास कारणीभूत ठरू शकते.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य

आपल्या शरीरातील हार्मोनल बदल हे रागाचे प्रमुख कारण आहे. विशेषत: रजोनिवृत्ती, मासिक पाळी, शारीरिक वेदना, मानसिक आरोग्याच्या समस्या इत्यादी राग येण्याची कारणे असू शकतात. इतकंच नाही तर तुम्हाला नीट झोप येत नसेल, योग्य आहार तुम्ही घेत नसाल, व्यायाम करत नसाल तर हे देखील रागाच्या समस्यांचे कारण ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐश्वर्याचं सुपरहिट 'कजरा रे' गाणं गाणाऱ्या गायिकेला मिळालेलं निव्वळ इतकं मानधन; म्हणाली "माझी किंमत नाही"

Fadnavis Interview: मोदींना आंबा, तर फडणवीसांना संत्रा… अक्षय कुमार पुन्हा ट्रोल; मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर!

18 वर्षानंतर 'दामिनी' प्रेक्षकांच्या भेटीला, वेळ अन् मुहुर्त ठरला, निर्भिड पत्रकार पुन्हा समोर, सुबोध भावेची महत्त्वाची भूमिका

INDW vs PAKW: भारताने केलेलं रनआऊट योग्यच! पाकिस्तानला क्रिकेटचा नियम सांगत MCC ने दाखवला आरसा

Manikrao Kokate : मला रम्मी खेळता येत नाही!”; मंत्री कोकाटे यांचा न्यायालयात दावा

SCROLL FOR NEXT