beer esakal
आरोग्य

अचानक दारू पिणं बंद केल्यास त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?

अचानक दारू पिणे बंद केल्याने व्यक्तीची भूकदेखील कमी होते.

सकाळ डिजिटल टीम

लोक हल्ली सहज दारू पितात. मात्र जर तुम्ही नियमितपणे दारू पितं असाल आणि त्यानंतर तुम्ही अचानक दारू पिणं बंद केल्याने तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होतोच.

आजच्या लेखात आपण अचानक दारु पिणं बंद केल्यास त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

1) अचानक दारू पिणे बंद केल्याने व्यक्तीची भूकदेखील कमी होते. मात्र इच्छा नसतानाही काहीतरी खाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. यामुळे तुमच्या तब्येतीवर जास्त परिणाम होणार नाही. मात्र भूक न लागणे खूप वाढले असेल तर एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

2) नियमित दारू  पिणाऱ्या लोकांनी जर अचानक दारू पिणे बंद केले तर त्यांना खूप अस्वस्थ वाटू शकते. जेव्हा आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय लागलेली असते त्यानंतर ती गोष्ट आपण अचानकपणे सोडल्यास आपले शरीर थोडे अस्वस्थ होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. तुमची ही अस्वस्थता काही दिवसात दूर होईल.

3) दारु पिल्यानंतर साधारणपणे कोणत्याही व्यक्तीला शांत आणि लवकर झोप लागते. ज्या लोकांना कायम दारु पिऊन झोपण्याची सवय असते. त्यांना मद्यपान सोडल्यास कित्तेक दिवस लवकर झोप लागत नाही. कारण तुमच्या मन आणि मेंदूला मद्यपान केल्यानंतरच शांत होण्याची सवय लागलेली असते.

4) रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने सकाळी थकवा आणि आळस येऊ शकतो. मात्र असे काही दिवस होईल. काही दिवस हा त्रास सहन केल्यास तुमची दारू पिण्याची सवय सुटेल आणि त्यानंतर तुम्ही आनंदी आणि स्वस्थ जीवन जगू शकता.

5) हल्ली दारू पिणं म्हणजेच अल्कोहोल घेणं खूप सामान्य गोष्ट झाली आहे. लोक आनंद साजरा करण्यासाठी बऱ्याचदा समवयस्कांसोबत मस्त दारू किंवा बिअर पितात. खास करून विकेंड म्हणजे शनिवार रविवार हे तर  दारू पिण्यासाठी राखीव असलेले दिवस असतात. कारण या दिवशी लोकांना सुट्टी असते. थोडक्यात लोक हल्ली रोजच सहज म्हणून दारू पितात.

6) मात्र जर तुम्ही सतत दारू पित असाल आणि त्यानंतर तुम्ही अचानक मद्यपान सोडल्यास त्याचेही तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होतात. त्यामुळे तुम्हाला जर का दारू सोडायची असले तर एखाद्या तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या मनावर नियंत्रण कसे ठेवता येईल यावर काम करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain : कोल्हापूर विभागात ओला दुष्काळ! ऊस उत्पादनात ३५ ते ४० लाख टनांची घट होण्याची शक्यता

Satara : महिला डॉक्टर हॉटेलवर का गेली? मध्यरात्री दीड वाजता 'चेक इन', २ दिवसाचं बूकिंग; दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला

Latest Marathi News Live Update : फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

Panvel News: मोलाचा जीव संकटात! कळंबोली, कामोठेतील ४० सोसायट्यांना नोटिसा, अग्निशमन यंत्रणा बंद; नेमकं प्रकरण काय?

Turntable Ladder : ‘टर्नटेबल लॅडर’ म्हणजे काय? कागल उरुसात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी कोल्हापूर अग्निशमन दलाची शौर्यपूर्ण मोहीम

SCROLL FOR NEXT