आरोग्य

Arthritis Tips : आर्थरायटिसबद्दल प्रत्येकाला 'हे' माहिती असायलाच हवे

वृद्धत्वामुळे सांध्यांची झीज होणे हा आर्थरायटिसचा सर्वात सामान्य प्रकार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Every Thing About Arthritis : मानवी शरीरामध्ये सांध्यांवर परिणाम करणाऱ्या १०० पेक्षा जास्त स्थितींना आर्थरायटिस असे म्हटले जाते. यामध्ये एक किंवा अधिक सांध्यांमध्ये जडपणा, अशक्तपणा, वेदना, सूज निर्माण होऊ शकते.

सांधेदुखी

सांध्यांभोवतीच्या लिगामेंट्स व टेंडन्सचे देखील नुकसान होऊ शकते. या आजारात हाडांचा हळूहळू ऱ्हास होत जातो, सांध्यांच्या मध्यभागी जे संरक्षक टिश्यू असतात त्यांचे या आजारात नुकसान होते. आर्थरायटिसची सुरुवात विविध कारणांमुळे होऊ शकते. आज आपण याच आजाराबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रत्येक सांध्यामध्ये एक संरक्षक टिश्यू असतो, जो आपल्या हाडांना एकमेकांवर घासण्यापासून रोखतो. वृद्धत्वामुळे सांध्यांची झीज होणे हा आर्थरायटिसचा सर्वात सामान्य प्रकार आहे. कुटुंबामध्ये आधी कोणाला आर्थरायटिस झालेला असेल तर पुढील पिढ्यांना देखील हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. स्थूलपणामुळे सांध्यांवर खूप जास्त ताण निर्माण होतो आणि सांध्यांची झीज वेगाने होऊ लागते.

आर्थरायटिसबाबत वेळीच लक्षात आले तर, त्यावर व्यवस्थित उपचार केले जाऊ शकतात. यामध्ये सुरुवातीची लक्षणे समजून घेतल्याने आजार बळावण्याचा कालावधी लांबवण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात.

Gout

आर्थरायटिसची नेमकी लक्षणं काय?

सांध्याभोवती कडकपणा, सूज, कमजोरी आणि वेदना होणे किंवा त्यांच्या सभोवतालची त्वचा लालसर दिसणे ही आर्थरायटिसची प्रारंभिक चिन्हे आहेत. आर्थरायटिसचे प्राथमिक आणि दुय्यम असे दोन भाग केले जाऊ शकतात. ऑस्टिओआर्थरायटिस (OA) आणि र्ह्युमटॉइड आर्थरायटिस (RA) हे प्राथमिक संधिवातांचे दोन सर्वात जास्त आढळून येणारे प्रकार आहेत.

ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये सांध्यांच्यामध्ये कार्टिलेजची झीज होत जाते तर, र्ह्युमटॉइड आर्थरायटिस शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करण्याबरोबरच सांध्यांवरील अस्तराचे नुकसान करतो.

कसे होते निदान?

एक्सरे आणि रक्ततपासणी करून आर्थरायटिसचे निदान करता येऊ शकते. तंबाखूचे अतिसेवन, अति जड व्यायाम आणि शरिराचे वजन नियंत्रात ठेवून आर्थरायटिस टाळता येऊ शकतो. आर्थरायटिसचे निदान झाल्यानंतरदेखील व्यायाम करणे टाळू नये कारण बैठ्या जीवनशैलीमुळे हृदय व रक्तातील साखरेच्या स्तरावर विपरीत परिणाम होऊन शरीराला अधिक धोका उत्पन्न होऊ शकतो.

डॉ. सुभाष धिवरे, ऑर्थोपेडिक्स कंन्सलटन्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT