Schizophrenia esakal
आरोग्य

Schizophrenia : स्किझोफ्रेनिया आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

स्किझोफ्रेनिया हा आजार कुणालाही आणि कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो.

Monika Lonkar –Kumbhar

Schizophrenia : स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार आहे. हा एक प्रकारचा गंभीर आजार मानला जातो. या आजाराने पीडित असलेल्या व्यक्ती अनेकदा गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतात. हा आजार कुणालाही आणि कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. हा आजार दुर्मिळ असला तरी गंभीर आहे.

या आजारामुळे जगभरातील २० लाख लोकांना याचा फटका बसला असून यातले बहुतेक रूग्ण हे किशोरवयीन आहेत. स्किझोफ्रेनिया हा एक प्रकारचा ग्रीक शब्द आहे. विभाजित मन असा या शब्दाचा अर्थ आहे. या आजारामध्ये पीडित व्यक्तीची स्थिती ही नेहमी गोंधळलेली असते.

या आजाराची लक्षणे कोणती? आणि हा आजार होण्यामागची कारणे कोणती ? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणे कोणती ?

  • एकटे राहणे

  • लोकांपासून दूर राहणे

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे

  • नेहमी गोंधळलेली मनस्थिती असणे

  • अस्वस्थ वाटणे

  • आयुष्याबद्दल निराश असणे

  • चेहरा पडलेला दिसणे

  • वजन कमी होणे

  • चांगल्या प्रकारे काम करण्यास असमर्थ

  • परिस्थितीनुसार भावना नसणे

  • भूकेच्या पॅटर्नमध्ये बदल होणे

  • सतत भास होणे

स्किझोफ्रेनिया आजार होण्यामागची कारणे कोणती ?

  • ड्रग्जचे सेवन करणे

  • दारूचे सेवन जास्त प्रमाणात करणे

  • खूप ताण घेणे

  • काही अनुवांशिक कारणे असू शकतात.

  • मेंदूचा कोणताही जुनाट आजार

स्किझोफ्रेनिया आजारावरील उपचार

स्किझोफ्रेनिया या आजाराची कोणतीही अचूक चाचणी करता येत नाही. शिवाय, अशा प्रकारची कोणतीही चाचणी जगात उपलब्ध नाही. त्यामुळे, जगभरातील डॉक्टर, वैद्यकीय केसेस, मानसिक स्थिती, सामाजिक घटक आणि लक्षणे यानुसार पीडित व्यक्तीवर उपचार केले जातात.

योगासने, ध्यानधारणा, थेरपी, औषधे आणि कुटुंबातील व्यक्तींचा पाठिंबा यांच्या मदतीतून या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवले जाते. या आजारामध्ये पीडित व्यक्तीला कुटुंबाचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. पीडित व्यक्तीने ड्रग्ज, दारूचे सेवन टाळणे महत्वाचे असते. जेणेकरून या आजारातून बाहेर पडायला मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT