Wheatgrass Juice Benefits esakal
आरोग्य

Wheatgrass Juice Benefits : युरिक ऍसिड वाढल्याने किडनी निकामी होऊ शकते?; या धान्याचं गवत करेल मदत!

तुमच्या शरीरात युरिक ऍसिड जमलंय हे कसं ओळखावं?

Pooja Karande-Kadam

Health Benefits of Wheatgrass Juice : हल्ली प्रत्येकाला युरिक अ‍ॅसिडची समस्या त्रास देत आहे. महिला व पुरुष या दोघांमध्येही समस्या हल्ली जोर धरत आहे. ही अशी एक समस्या आहे, या समस्येमुळे शरीरात विशिष्ट पदार्थाची निर्मिती होते. या पदार्थामुळे आपल्या शरीरातील किडनीवर विपरीत परिणाम होतो.

आपल्या किडनीची कार्यक्षमता व्यवस्थित काम करत नाही. यूरिक अ‍ॅसिड चा थेट विपरीत परिणाम आपल्या किडनीवर होतो. शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढण्यास किडनी फेल सुद्धा होऊ शकते. (Wheatgrass Juice Benefits : High uric acid will be reduced by the juice of this grass, know how to consume it)

युरिक ऍसिड नक्की कसं जमतं?

शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने सांधे, गुडघे आणि हात-पायांच्या बोटांमध्ये तीव्र वेदना होण्याची तक्रार असते. युरिक ऍसिड हे एक निरुपयोगी पदार्थ आहे जे शरीरातून बाहेर टाकण्याऐवजी, जेव्हा ते जमा होण्यास सुरुवात होते. (Uric Acid Reasons)

शरीरात युरिक ऍसिड जमा होण्याची कारण

-आनुवांशिकता

- चुकीच्या आहार पद्धती

- अल्कोहोल चे अधिक सेवन

- बाहेरचे पदार्थ खाणे

- डायबिटीज कारणामुळे

- कीमोथेरेपी कारणामुळे

- जास्त वेळ उपाशी राहणे

तुमच्या शरीरात युरिक ऍसिड जमलंय हे कसं ओळखावं?

जेव्हा आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड ची कमतरता असते किंवा शरीरामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असेल तर अशा वेळी प्रत्येकाला वेगवेगळी लक्षणे जाणवू लागतात. तसे पाहायला गेले तर ही लक्षणे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असतात.

शरीरात जास्त वेळ यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यास आपल्याला भविष्यात गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, गुडघेदुखी ,शरीरामध्ये गाठ किडनी यासारख्या समस्या जोर धरतात. (Wheat Flour)

जेव्हा ही नको असलेली गोष्ट शरीरात जमा होते तेव्हा ती आपल्यासाठी अडचण बनते. मूत्रपिंड रक्तातून यूरिक ऍसिड स्वच्छ करण्याचे काम करते. जे मूत्रामार्गे बाहेर जाते. युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे गाउट आणि संधिवात यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

तुम्हीही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल, तर युरिक अॅसिडमध्ये काय प्यावे? म्हणून आम्ही तुम्हाला गव्हाच्या रसाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे वाढलेल्या यूरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवता येते. (Wheat grass benefits in uric acid )

यूरिक ऍसिडसाठी कोणता रस सर्वोत्तम आहे?

जीवनशैली आणि आहार सुधारून उच्च यूरिक ऍसिड दुरुस्त केले जाऊ शकते. युरिक अॅसिड वाढल्यावर गव्हाचा रस पिणे फायदेशीर ठरते, त्यात व्हिटॅमिन बी, ई, के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयोडीन यांसारखे पोषक घटक असतात ज्यात अँटी-ऑक्सिडंट, जस्त, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-कर्करोगजन्य गुणधर्म असतात. गव्हाचा रस रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. (Uric Acid issue)

गव्हाच्या गवताचा रस कसा बनवला जातो?

हा रस बनवण्यासाठी दोन चमचे व्हीटग्रास पावडर एका ग्लास पाण्यात मिसळा आणि मिक्सरमध्ये टाकून चांगले मिक्स करा. तुमचा गव्हाचा रस तयार आहे.

याशिवाय 1 ग्लास पाण्यात गव्हाच्या गवताच्या काड्या मिसळूनही ज्यूस बनवू शकता. बनवल्यानंतर गाळून प्या. लक्षात ठेवा की जर तुम्हाला हा रस पिण्याची ऍलर्जी असेल तर त्याचे सेवन करू नका. गव्हाचा रस रोज सेवन केला तरच फायदा होईल.

ताजे गव्हाचे गवत कसे मिळतील

तुम्हाला या उपायासाठी गव्हाची पावडर वापरायची नसेल. तर, तुम्ही घरीच गव्हाचे पिक घेऊ शकता. घरी एक छोटी कुंडी असेल तर त्यात तुम्ही गव्हाचे काही दाणे टाका. त्यावर सातत्याने पाणी शिंपडत रहा. असे केल्याने तिथे त्यातून कोंब फुटतील. त्या कोंबांची चांगली वाढ झाली की त्यापासून तुम्ही हा ज्यूस बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT