Oil For Health esakal
आरोग्य

Oil For Health : ऑलिव्ह ऑइल वापरताय? हे पदार्थ बनवण्यासाठी वापराल तर होईल कॅन्सर..

चला तर स्वयंपाकासाठी कोणते तेल आरोग्यदायी आहे ते जाणून घेऊया

साक्षी राऊत

Oil For Health : स्वयंपाक घरात तेलाचा वापर हा जवळजवळ प्रत्येक पदार्थांत होतो. मात्र प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात एकाच प्रकारचे तेल वापरले जात नाही. काही लोक सोयाबिन तेल, तर काही तिळाचे तर काही राइस तेल सुद्धा वापरतात. पण स्वयंपाकात नेमके कोणत्या प्रकारचे तेल वापरावे हे तुम्हाला माहितीये का? चला तर स्वयंपाकासाठी कोणते तेल आरोग्यदायी आहे ते जाणून घेऊया.

तेलामुळे वाढणारे आजार

पूर्वी तुपाचा वापर स्वयंपाकासाठी केला जात असे. पण महागाईमुळे आता लोक मोहरीचे तेल किंवा रिफाइंड तेल वापरतात. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की तेलाच्या अतिसेवनामुळे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड, फॅटी ऍसिडस् आणि लठ्ठपणा वाढतो. या तेलांऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

ऑलिव्ह ऑइल हे अत्यंत आरोग्यदायी तेल मानले जाते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. पण भारतीय अन्न शिजवण्यासाठी ते उपयुक्त आहे का?

पाश्चिमात्य देशांमधून आला ऑलिव्ह ऑईलचा ट्रेंड

पाश्चिमात्य देशांमध्ये ऑलिव्ह ऑईलचा वापर जास्त केला जात असे. इथल्या बहुतेक गोष्टी भाजून, उकळून, वाफवून, तळून बनवल्या जातात. ज्यामध्ये तेल जास्त गरम करावे लागत नाही.

पाश्चिमात्य देशांमध्ये स्वयंपाक वेगळ्या पद्धतीने बनवला जातो

भारताची पाक शैली पाश्चात्य देशांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आपल्याकडे तेलात कुठलाही पदार्थ तळण्यासाठी तेल जास्त तापमानावर तापवले जाते. (Lifestyle)

ऑलिव्ह ऑइलमध्ये स्मोक पॉइंट कमी असतो

मोहरीचे तेल, खोबरेल तेल किंवा तुपाच्या तुलनेत ऑलिव्ह ऑइलमध्ये स्मोक पॉइंट खूप कमी असतो. त्यामुळे ते इतर तेलांपेक्षा जास्त वेगाने गरम होते आणि धूर निघू लागतो.

कर्करोग होऊ शकतो

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या संशोधनानुसार, तेल खूप वेळा गरम केल्याने किंवा स्मोक पॉईंटच्या पलीकडे गरम केल्याने त्याची चरबी फाटते . दरम्यान त्यात कर्करोग निर्माण करणारे हानिकारक घटक देखील तयार होतात. (Health)

ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवू नका या गोष्टी

मसूर शिंपडणे, भटुरे तळणे, पकोडे बनवणे, पुरी, समोसे, फ्रेंच फ्राई, चिकन फ्राय इत्यादी पदार्थांसाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर हानिकारक ठरू शकतो.

ऑलिव्ह ऑइलचे फायदे

ऑलिव्ह ऑइल सामान्य पदार्थांमध्ये फायदेशीर ठरू शकतो. त्यात अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत आणि हृदयरोग आणि मधुमेहाशी लढण्याची खासियत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : दहा तोंडी राजकारण..!

Easy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा काहीतरी हटके! लिहून घ्या क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलडची सोपी रेसिपी

आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2025

सोलापुरातील शुद्ध अन्‌ नैसर्गिक गोड पाण्याचा तलाव माहितीयं का? १५४ वर्षांचा अदिला नदीवरील एकरुख तलाव आता ‘वर्ल्ड हेरिटेज’च्या यादीत; महाराष्ट्रातील दुसरा तलाव

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT