Health Tips 
आरोग्य

Health Tips : तुमच्याही हाताच्या नसा दिसतात?; जाणून घ्या कारणे..

काही खास कारणामुळेही तुमच्या नसा दिसू शकतात, हातापायांच्या नसा का दिसतात याबद्दल जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

काही खास कारणामुळेही तुमच्या नसा दिसू शकतात, हातापायांच्या नसा का दिसतात याबद्दल जाणून घेऊया.

अनेकांच्या हातापायांच्या रक्तवाहिन्या अगदी स्पष्ट दिसतात. असे झाल्यास उगाचच आपण शरीरात कशाची तरी कमतरता झाली अशी भीती वाटू लागते. पण हातांच्या नसा दिसण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. हातांच्या नसा दिसणे हे कोणत्या आजाराचे लक्षण नाही. तर काही खास कारणामुळेही तुमच्या नसा दिसू शकतात. हातापायांच्या नसा का दिसतात याबद्दल जाणून घेऊया.

वजन कमी होणे

तज्ञांच्या मते, हाताच्या नसा दिसण्याचे एक कारण वजन कमी होणे हे असू शकते. वजन कमी करणाऱ्या लोकांच्या हातात नसा दिसतात. अचानक शरीरातील फॅट कमी झाल्यानंतरही तुमच्या अशा नसा दिसू लागतात.

व्यायाम

व्यायाम केल्यामूळे रक्ताभिसरण अधिक प्रमाणात होते. यामुळे देखील हातांच्या नसा दिसतात. जेव्हा तूम्ही जास्त वजन उचलता तेव्हा स्नायूंवर ताण येतो. यामुळे नसा सुजतात.पण, जेव्हा रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तेव्हा सुजलेल्या नसा पुर्वीसारख्या होतात.

आनुवंशिकता

अनुवांशिकतेमुळेही नसा दिसू शकतात. तुमच्या आई-वडिलांच्या किंवा इतर कुणाच्या शरीरातील नसा फुगलेल्या असतील, तर तुमच्या हातातही तसे दिसत असल्यास हे सामान्य असते.

वाढते वय

वयोमानानुसार हातांच्या नसाही दिसू लागतात. खरं तर, वयानुसार त्वचेचा थर पातळ होतो. यामुळे हातांवरच्या नसा अधिक स्पष्ट दिसतात. वय वाढले की नसांमधील पडदा कमकुवत होतो, त्यामुळे रक्त जमा होऊन नसा फुगीर दिसू लागतात.

व्हेरिकोज व्हेन्स (अपस्फित नीला)

रक्तवाहिन्यांमध्ये जर कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे त्या फुगीर झाल्या तर या त्रासाला व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. या आजारामध्ये हाताला वेदना होऊ शकतात, त्यामुळे त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल; थोडाचवेळात धडाडणार तोफ

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT