Raw Mango sakal
आरोग्य

Raw Mango: उन्हाळ्यात का करावे कैरीचे सेवन माहितिये का? जाणून घ्या कारण आणि फायदे

कैरीचे लोणचं किंवा पन्हं या स्वरूपातही तुम्ही कैरीचे सेवन करू शकता. उन्हाळ्यात कैरी खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात.

Aishwarya Musale

उन्हाळ्यात आंबा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. या हंगामात आंब्याचे विविध प्रकार येतात. यामध्ये अल्फोन्सो आणि आम्रपाली यांसारख्या अनेक प्रकारच्या आंब्यांचा समावेश आहे. याशिवाय कच्च्या आंब्याचाही त्यात समावेश आहे.

कच्च्या आंब्याला कैरी असेही म्हणतात. ते आंब्यापेक्षा थोडे लहान असतात. त्याची चव खूप आंबट असते. कच्च्या आंब्याचा थंड प्रभाव असतो. उन्हाळ्यात तुम्ही ते अनेक प्रकारे खाऊ शकता.

करी बनवण्यासाठी तुम्ही कैरीचा देखील वापरू शकता. याशिवाय त्यापासून कैरीचे पन्हेही तयार केले जाते. कैरीचे पन्हे चव आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. उन्हाळ्यात हे खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. चला जाणून घेऊया कैरी उन्हाळ्यात का खावी.

शुगर कमी असते

कैरीमध्ये इतर ताज्या फळांच्या तुलनेत नैसर्गिक साखर कमी असते. एवढंच नाही तर कैरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते. त्यामुळे ते खाणे फायदेशीर ठरू शकते.

हृदयासाठी चांगली असते

कैरीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम दोन्ही रक्त प्रवाह सुधारतात. तसेच त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

हे पोषक तत्व रक्तदाब पातळी नियंत्रणात ठेवण्याचे देखील काम करतात. कैरीमध्ये असलेले मॅंगिफेरिन एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट आहे. हे हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते.

पाचन तंत्र

कच्च्या आंब्यात अमायलेस असते. हे एक पाचक एंझाइम आहे. कच्चा आंबा खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. कैरी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे माल्टोज आणि ग्लुकोज सारख्या शर्करामध्ये रूपांतरित करण्याचे देखील काम करते.

कोलेस्ट्रॉल

डिटॉक्सिफिकेशन हे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. कच्या आंब्यामध्ये पोषक तत्व असतात जे तुमच्या शरीराला डिटॉक्स प्रक्रियेत मदत करतात. तसेच कैरी खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

वेट लॉस

वेट लॉस करण्यासाठी कैरी खूप महत्वाची असते. कारण कैरीमध्ये कॅलरीज कमी असतात. तुम्ही उन्हाळ्यात स्नॅक्स म्हणूनही कैरी खाऊ शकता.

कैरी खाल्ल्याने निरोगी वजन राखण्यास देखील मदत होते. व्हिटॅमिन सी, के, ए, बी6 आणि फोलेटसारखे अनेक पोषक घटक कैरीमध्ये असतात. तसेच कैरी पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाणदिनानिम्मीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणाले पंतप्रधान? योगींनी शेअर केला खास video

Indigo Flight रद्द झाल्यानंतर प्रवाशांना पूर्ण पैसे परत मिळतील का? विमान कंपन्यांचे नियम काय सांगतात?

NZ vs WI 1st Test : भले शाब्बास... Justin Greaves च्या द्विशतकाने विंडीजला वाचवले, विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या न्यूझीलंडला रडवले

'बोलविता धनी': हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितिज दाते सज्ज!

Ahilyanagar : भाजप नेत्यानं लग्नासाठी तगादा लावला, नर्तिकेनं आयुष्य संपवलं; पत्नीनं लढवलीय नगरपरिषदेची निवडणूक

SCROLL FOR NEXT