Heart Attack in women Esakal
आरोग्य

Heart Health : हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचा धोका पुरूषांपेक्षा महिलांना दुप्पट; संशोधनात धक्कादायक बाब उघड

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या परिषदेत याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

Sudesh

पुरूषांच्या तुलनेत महिलांना हार्ट अटॅक, म्हणजेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो, असं संशोधनात सिद्ध झालं आहे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या परिषदेतील 'हार्ट फेल्युअर २०२३' या चर्चासत्रात याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

पोर्तुगालमधील ग्रासिया दे ओर्टा या हॉस्पिटलमधील डॉ. मारियाना मार्टिनहो यांनी याबाबत संशोधन केले. "हृदयविराकामुळे मृत्यू होण्याची शक्यता पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये दुप्पट असते. विशेषतः हृदयस्नायूमध्ये रक्ताची गुठळी झालेल्या महिलांना याचा धोका सर्वाधिक असतो" असं मारियाना यावेळी म्हणाल्या.

यापूर्वी झालेल्या एका संशोधनात असं दिसून आलं होतं, की एसटी-इलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन (STEMI) असलेल्या महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका पुरूषांच्या तुलनेत अधिक आहे. या संशोधनात STEMI चे निदान झालेल्या रुग्णांवरील शॉर्ट आणि लाँग टर्म परिणामांवर अभ्यास करण्यात आला.

असं केलं संशोधन

या संशोधनात एकूण ८८४ रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. यामध्ये २७ टक्के महिला होत्या. या चाचणीतील पुरूषांचं सरासरी वय ६० वर्षे होतं, तर महिलांचं सरासरी वय ६७ वर्षे होतं. यातील महिलांना हाय ब्लड प्रेशर, डायबेटिस अशा आजारांची लागण झाली होती. तसेच, त्या यापूर्वी धूम्रपान करायच्या. तर, पुरुषांना हृदयातील रक्तवाहिन्यांचे विकार होते, आणि त्यांना धूम्रपानाची सवय होती.

सर्व ८८४ रुग्णांवर लक्षणे दिसणे आणि पीसीआय (PCI) उपचार यामधील वेळ सारखीच ठेवण्यात आली होती. मात्र तरीही, ५५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या महिला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यास भरपूर वेळ (९५ मिनिट) लागला. तुलनेने त्याच वयोगटातील पुरूषांवर मात्र लवकर (८० मिनिट) उपचार सुरू करण्यात आले.

धक्कादायक निकाल समोर

संशोधनाच्या ३० व्या दिवशी एकूण सहभागी रुग्णांपैकी ११.८ टक्के महिलांचा, तर ४.६ टक्के पुरूषांचा मृत्यू झाला होता. पाच वर्षांनंतर एकूण सहभागी रुग्णांपैकी सुमारे एक तृतीयांश महिलांचा (३४.२%), तर १६.९ टक्के पुरूषांचा मृत्यू झाला होता. या पाच वर्षांच्या काळामध्ये सुमारे ३४.२ टक्के महिलांना हृदयविकाराचा गंभीर झटका येऊन गेला होता. पुरूषांच्या तुलनेत (१९.८ टक्के) ही आकडेवारी दुपटीहून अधिक आहे.

एकसारख्या वातावरणात ठेऊन, तसेच सारखेच उपचार करूनही महिलांना हृदयविकाराचे गंभीर झटके येण्याचे, तसेच मृत्यू होण्याचेही प्रमाण (Women more likely to die due to heart attack than men) पुरूषांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक राहिले.

मॅनोपॉझनंतर धोका अधिक

डॉ. मार्टिनहो म्हणाल्या, "मॅनोपॉझ येऊन गेलेल्या महिलांमध्ये समान वयोगटातील पुरूषांच्या तुलनेत हृदयविकाराची गंभीर लक्षणे आणि परिणाम दिसून आले. तसेच, मॅनोपॉझ न आलेल्या महिलांमध्ये शॉर्ट टर्म मृत्यूदर सारखाच होता, मात्र त्यांच्या वयाच्या पुरूषांच्या तुलनेत लाँग टर्म रोगनिदान कमी होते. स्त्री आणि पुरूषांमधील या फरकांची कारणे आम्ही या संशोधनात शोधली नाहीत. यामध्ये कदाचित अनुवांशिक पूर्वस्थितीची भूमिका महत्त्वाची असू शकते."

"महिलांमधील हृदयविकारासंबंधी जागरूकता निर्माण करण्याची मोठी गरज असल्याचं या संशोधनातून सिद्ध होतंय. स्त्रियांमध्ये आणि पुरूषांमध्ये याबाबत एवढा फरक का आहे याबाबत अधिक संशोधन गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात उपचारासंबंधी पावलं उचलता येतील", असं मत डॉ. मारियाना यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT