World Acupressure Therapy Day esakal
आरोग्य

World Acupressure Therapy Day : हिंदू धर्मात लहानपणीच बाळाचे कान का टोचतात?

कान टोचण्यामागे फक्त धार्मिक नाही तर शास्त्रीय कारण पण आहे. आज फॅशन समजली जाणारी ही परंपरा वैज्ञानिकदृष्ट्यापण महत्वाची आहे.

सकाळ डिजिटल टीम

World Acupressure Therapy Day : हिंदी धर्मात मुल जन्माला आल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत १६ संस्कार सांगितले आहेत. त्यापैकी मुल सव्वा महिन्याचं होईपर्यंत त्यांचे कान टोचले जावे असा एक संस्कार समजला जातो. ते छिद्र बुजू नये म्हणून त्यात सोन्याची तार घातली जाते. त्यात सौंदर्य आणत वेगवेगळ्या प्रकारचे कानातले घातले जातात.

पण ही फॅशन करता यावी म्हणून हे कान टोचले जात नसून यामागे काही वैज्ञानिक कारण आहेत. त्यामुळे फक्त मुलींचेच नाही तर मुलांचेही कान टोचले जातात. आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा पाळली जाते.

कान टोचण्याचे फायदे

​होतो मेंदूचा विकास

कान टोचल्याने लहान वयातच मुलांच्या मेंदूचा विकास होतो. कान टोचल्याने मेंदूतील काही भाग सक्रिय होतात. अ‍ॅक्यूप्रेशर थेरपीच्या सिद्धांताप्रमाणे, 'मेरिडियन' पॉंइटला उत्तेजित केल्यास मेंदूचा लवकर विकास होतो.

नजर होते चांगली

कानाच्या मध्यबिंदूवर डोळ्यांचा प्रकाश अवलंबून असतो. कान टोचल्याने डोळ्यांना चांगले दिसते. तसेच, व्यक्तीला डोळ्यांचे विकार होत नाहीत.

​ऐकण्याची कला होते सक्षम

आयुर्वेदानुसार, कान टोचल्याने लहान मुलांची ऐकण्याची क्षमता विकसित होत जाते. तसेच, कान टोचल्याने ऐकू येण्याच्या समस्येपासून सुटका होते, असं मत अॅक्यूप्रेशर तज्ञ व्यक्त करतात.

ताणतणाव, भीती जाते!

कान टोचल्याने मेंदूचा विकास होतो. कान टोचल्यामुळे मेंदूशी निगडीत फिट येण्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. कान टोचल्याने ताणतणाव, भीती यांसारख्या समस्यांना दूर होतात.

मासिक पाळीचा त्रास होत नाही!

आयुर्वेदानुसार, कान टोचलेल्या महिलेचा मासिक धर्म चांगला राहतो. महिलांच्या मासिक पाळीसंबंधित समस्या काही प्रमाणात कमी होतात. त्यांना त्याचा त्रास होत नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT