World Hepatitis Day  esakal
आरोग्य

World Hepatitis Day : बाबो, आता टॅटू काढतानासुद्धा कावीळ होण्याचा धोका, जरा जपून..!

हिपॅटायटिस ई. व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून पोटात शिरतात. यकृतावर हल्ला करतात. याची लक्षणे व रक्त तपासणीतून निदान पक्के होते

साक्षी राऊत

जागतिक कावीळ दिवस

कावीळ झाल्यास घरगुती औषधे घेण्याकडे अनेकांचा कल असतो. ते धोक्याचे आहे.तर काही चुकीच्या जाहिरातीमुळे ३० ते ४० टक्के रुग्ण भोंदूबाबांकडून उपचार घेतात. यामुळे दोन आठवड्यात स्वत:हून बरा होणारा हा आजार गंभीर रूप धारण करतो. अंगावर टॅटू काढताना वापरल्या जाणाऱ्या सुईतून कावीळ होण्याची भीती आहे. रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे रुग्णालयात औषधोपचार घ्यावे.

काविळीचे पाच प्रकार

1) हिपॅटायटिस-ए व ई.

हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई. व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून पोटात शिरतात. यकृतावर हल्ला करतात. याची लक्षणे व रक्त तपासणीतून निदान पक्के होते. यात रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्त तपासणीत बिलिरुबिन वाढलेले असते. हिपॅटायटिस ए हा लहान मुलांना होतो. तर पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना हेपाटायटिस ई. होतो.

हिपॅटायटिस-बी व सी

हे व्हायरस रक्तातून शरीरात शिरतात. टॅटू काढताना सुई दूषित असली तर संसर्ग होण्याची भीती आहे. असुरक्षित शारीरिक संबंध, निर्जंतुकीकरण न केलेल्या सुया, शस्त्रक्रियेचे साहित्य, दूषित रक्त चढविल्याने, इंजेक्शनद्वारे ड्रग घेण्यातून ही कावीळ होतो. साधा ताप, थकवा येतो. काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरोसिस होतो.

आजाराची इतर कारणे

दारूच्या अतिसेवनामुळे यकृताच्या पेशींना इजा होते. यकृताला सूज येते. त्यामुळे कावीळ होते. पोटात पाणी होते.

औषधाचे यकृतावरील दुष्परिणामातून कावीळ होते. अनेक औषधे ही यकृताला घातक असतात. त्यामुळे ही औषधे घेतल्यानंतर काही जणांमध्ये कावीळ झालेली दिसून येते. (Lifestyle)

काविळीच्या प्रकारावरून उपचार करता येतात. ‘बिलिरुबिन’च्या उच्चस्तरामुळे डोळ्याचा पांढरा भाग, त्वचा किंवा श्लेष्मल पडद्यात पिवळेपणा येतो, हे काविळीचे लक्षण आहे. कावीळ अर्थात ‘जॉन्डिस’ हा यकृताचा (लिव्हर) आजार आहे. व्हायरलच्या संक्रमणात लिव्हरच्या पेशी अपयशी ठरतात. त्यावेळी कावीळ होतो. लिव्हरच्या गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी तत्काळ निदान, लसीकरण आणि दारूपासून दूर राहणे आवश्यक ठरते. (Health)

-डॉ. अमोल समर्थ, सहयोग प्राध्यापक,

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT