थोडक्यात:
कावीळची लक्षणं सुरुवातीला दिसत नाहीत, त्यामुळे वेळेवर निदान व उपचार आवश्यक आहेत.
कुटुंबात यकृत विकारांचा इतिहास असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचण्या करून घ्याव्यात.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्तसंपर्कामुळे विशेष खबरदारी घ्यावी.
How does Hepatitis Affect the Liver: कावीळची (हिपॅटायटिस) लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. त्यामुळे शरीरावर होणारा गंभीर परिणाम टाळण्यासाठी लवकर निदान आणि उपचार गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ज्यांच्या कुटुंबात कावीळ किंवा यकृताच्या आजाराचा वैद्यकीय इतिहास आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने निदान चाचण्या करून घ्याव्यात. आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा रक्ताशी संपर्क येत असल्याने त्यांनीदेखील खबरदारी घेण्याची गरज आहे.
२८ जुलैला ‘जागतिक कावीळ दिन’ असतो. यानिमित्त जगभरात जनजागृती केली जाते. यावर्षीची संकल्पना ‘हिपॅटायटिस : लेट्स ब्रेक इट डाऊन’ (कावीळ : चला समजून घेऊ) ही आहे. कावीळचे ‘ए, बी, सी, डी, ई’ असे पाच प्रकार आहेत. यातील ‘ए’ व ‘ई’ दूषित अन्न-पाण्यामुळे होऊ शकतो. तर ‘बी’, ‘सी’ व ‘डी’ हे बाधित व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात आल्यावर किंवा याने बाधित असलेल्या द्रव पदार्थांमुळे होऊ शकतो.
पूर्वी रक्तदान केल्यावर त्याची चाचणी न करता रुग्णाला दिले जात होते. त्यामुळे दूषित रक्त चढवले गेल्याने तसेच त्या व्यक्तीला वापरलेली सुई दुसऱ्या व्यक्तीला वापरल्याने या प्रकारच्या कावीळचा संसर्ग वाढत असे. मात्र, आता रक्तचाचण्या बंधनकारक केल्याने याचे प्रमाण घटले आहे. मात्र, दूषित अन्न-पाण्यामुळे होणारा कावीळ ही समस्या अजूनही कायम आहे.
भारतात हिपॅटायटिस ‘बी’, ‘सी’चे प्रमाण जास्त असून निदान न झाल्यास दीर्घकालीन यकृताचे आजार, यकृत निकामी होणे किंवा यकृताचा कर्करोग अशा अनेक गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. जुन्या सुयांचा पुनर्वापर, दुसऱ्याचे रेझर/ब्लेड वापरणे, असुरक्षित शारीरिक संबंध, बाधित व्यक्तीकडून रक्तसंक्रमण, मद्यसेवनासारख्या चुकीच्या सवयी, असे अनेक जोखमीचे घटक असतात.
कावीळची लक्षणे प्रारंभिक टप्प्यात दिसत नाहीत हे सर्वांत मोठे आव्हान आहे. कालांतराने कावीळ, ताप, थकवा, भूक न लागणे, मळमळ, उलट्या अशी लक्षणे दिसू शकतात. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर, यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच लवकर निदान व उपचार गरजेचे आहेत.
गर्भवती महिलांनी कावीळबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण याचा प्रसार मातेकडून बाळाला होऊ शकतो. सध्या पावसाळा सुरू आहे. म्हणून दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या कावीळ ‘ए’ आणि ‘ई’ बाबत काळजी घेतली पाहिजे. विशेष करून कावीळ ‘ई’ची तीव्रता गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत जास्त असू शकते. म्हणूनच घरचे अन्न खाणे, स्वच्छ पाणी किंवा पाणी उकळून पिणे हे योग्य आहे.
- डॉ. प्रविश घुरडे, पोटविकारतज्ज्ञ
कावीळची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात? (What are the early symptoms of hepatitis?)
कावीळच्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणं दिसत नाहीत, जे याचे सर्वात मोठे आव्हान आहे. काही दिवसांनंतर ताप, थकवा, भूक न लागणे, मळमळ, उलट्या, आणि डोळे व त्वचेला पिवळसरपणा अशी लक्षणे दिसू शकतात.
कावीळ कशी होते आणि ती कशामुळे पसरणे शक्य आहे? (How does hepatitis spread and what causes it?)
कावीळचे ‘ए’ आणि ‘ई’ प्रकार दूषित अन्न व पाण्यामुळे होतात. तर ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ प्रकार रुग्णाच्या रक्त, सुई, रेझर, असुरक्षित लैंगिक संबंध किंवा संक्रमित द्रवांद्वारे पसरणे शक्य असते.
कावीळपासून बचावासाठी कोणती खबरदारी घ्यावी? (What precautions should be taken to prevent hepatitis?)
स्वच्छ आणि उकळून घेतलेले पाणी प्यावे, घरचे व स्वच्छ अन्न खावे, रक्तदान किंवा उपचारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सुई निर्जंतुक असाव्यात, इतरांचे रेझर, टूथब्रश वगैरे वापरू नयेत, लैंगिक संबंध सुरक्षितपणे ठेवावेत, वेळोवेळी तपासणी करून घ्यावी.
गर्भवती महिलांसाठी कावीळ किती धोकादायक आहे? (How dangerous is hepatitis for pregnant women?)
गर्भवती महिलांसाठी विशेषतः ‘ई’ प्रकारची कावीळ अधिक घातक ठरू शकते, विशेषतः गरोदरपणाच्या अखेरच्या टप्प्यात. ही आईकडून बाळाला होऊ शकते. त्यामुळे त्यांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे – उकळलेले पाणी, स्वच्छ अन्न आणि नियमित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.