World Parkinson's Day Sakal
आरोग्य

World Parkinson's Day: अक्षरे वेडीवाकडी होत असतील तर सावधान...

पार्किन्सन हा मेंदूरोग असून ६५ वर्षे वयोगटातील १०० व्यक्तींमध्ये एकाला हा आजार आढळतो.

केवल जीवनतारे ः @kewalsakal

World Parkinson's Day 2022: शरीराच्या हालचालीत संथपणा आला, शरीराला कंपन येत आहेत, शरीर एका बाजुने निकामी होत असल्याचे संकेत मिळत आहेत, हात पाय कडक होत आहेत, पाठीचा कणा वाकत आहे, चालण्यास अडचण येत आहे, अचानक चालताना पडण्याची शक्यता आहे, लिहिताना अक्षर वेडेवाकडे होत आहे अशी लक्षणे आढळल्यास सावधान...तत्काळ मेंदुरोग तज्ज्ञांकडे धाव घ्यावी. ही सर्व लक्षणे पार्किन्सन आजाराची. पार्किन्सन हा मेंदूरोग असून ६५ वर्षे वयोगटातील १०० व्यक्तींमध्ये एकाला हा आजार आढळतो. (World Parkinson's Day 2022, Know about Parkinsons disease)

मेंदुरोग तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून ११ एप्रिल हा दिवस पार्किन्सन आजाराच्या आणि त्यांच्या काळजीवाहू लोकांचे जीवन सुधारण्यासंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोलॉजीचे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, पार्किन्सन आजाराची लक्षणे ओळखली जात नाहीत, २५ टक्के रुग्णांना पार्किन्सन असूनही निदान चुकीचे होते. चोर पावलांनी येणारा आजार आहे. यावर औषधोपचार नाही. केवळ न्यूरोलॉजिकल केअर आणि उपचारामुळे जीवन सुधारण्याच्या प्रयत्न करु शकतो.

''मेंदूत तयार होणाऱ्या डोपामिन नावाच्या रासायनिक बदलामुळे हा आजार उद्भवतो. संदेशवहनासाठी हे डोपामिन अत्यंत उपयुक्त असते. मात्र, त्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले, की पार्किन्सन येतो. विशेष म्हणजे हा आजार नेमका कोणत्या वयात उद्भवू शकतो. उतारवयात मेंदूवरील नियंत्रण बिघडते.''

-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विश्वस्त, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी

''जगात सुमारे ९० लाख व्यक्ती पार्किन्सन आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. आयुर्मान दर वाढत असल्यामुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. आपल्या देशात या रोगाचे ८ ते ९ लाख रुग्ण आहेत. १० वर्षानंतर हे प्रमाण दुप्पट होईल. पुरुषामध्ये दीडपटीने जास्त प्रमाण आहे. ४० वयोगटाखालील तरुणांमध्ये सुद्धा हा पार्किन्सन आजार दिसून येतो.''

-डॉ राजिंदर धमीजा, मेंदुरोग तज्ज्ञ

ही देखील पार्किन्सनची लक्षणे-

  • लिहितांना अक्षरांचा आकार लहान होतो

  • अक्षर वेडेवाकडे होतात

  • सहीमध्ये बदल होतो

  • तोंडातून लाळ सांडत असते

  • झोपेत व्यत्यय येतो

  • वेदना आणि पोटाचे विकार वाढतात

  • बद्धकोष्ठपणा, चिंता आणि नैराश्य दिसते

  • अशी आहेत कारणे

  • काही अनुवांशिक घटक

  • शरीरातील विषारी पदार्थ

  • वातावरणातील विषारी घटक

  • काही औषधेदेखील कारणीभूत ठरतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT