Medical Test Before Marriage sakal
आरोग्य

Medical Test Before Marriage : या आजाराच्या धोक्यामुळे लग्नापूर्वी करावी लागते वैद्यकीय तपासणी

हा अनुवांशिक आजार असल्याने लग्नापूर्वी या आजारासंबंधी वैद्यकीय तपासणी केली जाणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Medical Test Before Marriage : येत्या ८ मे ला जागतिक थॅलेसेमिया दिवस जगभर साजरा केला जाणार आहे. थॅलेसेमिया नावाचा आजार हा जन्मत: काही मुलांमध्ये दिसून येतो. या आजाराबाबत जनजागृती पसरावी, या उद्देशाने थॅलेसेमिया दिवस साजरा केला जातो.

थॅलेसेमिया हा मानवी रक्तात होणार अनुवांशिक आजार आहे. सामन्यत: दोन प्रकारचा थॅलेसेमिया असतो. एक मायनर आणि एक मेजर थॅलेसेमिया. ज्यांना मेजर थॅलेसेमिया असतो त्यांना दर २१ दिवसानंतर किंवा महिन्याभरानंतर रक्त द्यावं लागतं. त्यामुळे हा अनुवांशिक आजार असल्याने लग्नापूर्वी या आजारासंबंधी वैद्यकीय तपासणी केली जाणे गरजेचे आहे. (World Thalassaemia Day 2023 we should have to do medical test related to Thalassaemia before marriage )

डॉक्टर सांगतात की लग्नापूर्वी काही टेस्ट कराव्यात, त्यात थॅलेसेमियासंबंधीत टेस्ट करणेही तितकेच बंधनकारक आहे. अनुवांशिक आजार असल्याने लग्नानंतर तुमच्या बाळालाही हा आजार होऊ शकतो. हा आजारामुळे मुलांचे आयुष्य कमी होते. मुलं जास्त दिवस जगेल का, याची शक्यता नसते.

या आजारात रक्तातील ब्लड सेल्स योग्यप्रकारे निर्माण होत नाही. त्यामुळे या सेल्सचे आयुष्य कमी राहते. त्यामुळे दर महिन्याला मुलांना रक्त द्यावंं लागतं. याशिवाय या मुलांना अन्य आजारांचाही धोका असतो.

थॅलेसेमियाच्या रुग्णांच्या रक्तपेशींचे आयुष्य हे ऱक्त २० दिवसांचे असते. या रुग्णांमध्ये सतत हिमोग्लोबीनची कमतरता असते. ज्याचा परिणाम मुलाच्या संपुर्ण आरोग्यावर होतो. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी थॅलेसेमियासंबंधी टेस्ट करणे गरजेचे आहे आणि थॅलेसेमियाचे मायनर जरी लक्षणे आढळल्यास तरीसुद्धा डॉक्टरांशी संपर्क साधणे, गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT