Top 5 Lake Cities in India Sakal
Top 5 Lake Cities in India: भारतामध्ये अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव (Lake) आहेत. या तलावांमुळे अनेक शहरांच्या सौंदर्यात भर पडली आहे. आज आपण भारतातील अशा सुंदर शहरांबद्दल जाणून घेणार आहोत, जी तलावांसाठी प्रसिद्ध आहेत आणि त्या तलावांनी या शहरांचे सौंदर्य आणखी खुलवलं आहे.
1. उदयपूर (Udaipur)- पिचोला तलावामुळे उदयपूरचे रूप हे अजून खुललं आहे. या तलावामुळे उदयपुर सौंदर्यात भर पडली आहे. राजस्थानमधील या शहराच्या बरोबर मध्यभागी हा तलाव आहे. तलाव्याच्या परिसरातील राजवाडा आणि इतर सुंदर रचनांमुळे येथे भेट देण्याचा अनुभव नक्कीच संस्मरणीय ठरतो. 1362 मध्ये या कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली.2. भोपाळ (Bhopal)- मध्य प्रदेशातील हे शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे तुम्हाला अनेक तलाव नजरेस पडतील. येथे नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही प्रकारचे तलाव आढळतात. त्यामुळे येथे भेट देण्याचा तुमचा अनुभव नक्कीच संस्मरणीय असतो. भोपाळमधील अप्पर लेक प्रसिद्ध आहे. 3. श्रीनगर (Srinagar)- तलावांबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही श्रीनगरला वगळू शकत नाही. येथील सुंदर दल सरोवर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पर्वतांनी वेढलेल्या श्रीनगरमधील दल सरोवर हे देशातील सर्वात आकर्षक तलावांपैकी एक आहे. या तलावाचा सर्वात आश्चर्यकारक भाग म्हणजे तो हंगामानुसार भिन्न रूप धारण करतो.
4. नैनिताल (Nainital)- उत्तराखंडचा क्लासिक हिल टाउन अनुभव घ्यायचाय तर नैनितालला यायला हवं. नैनिताल तलाव हा भारतातील सर्वोत्तम पर्यटन ठिकाणांपैकी एक आहे. हे नैनितालमधील तलावांमध्ये तुम्ही बोटिंग करू शकता. तुम्ही वायव्येकडील नैना शिखर देखील पाहू शकता.5. कोडाईकनाल (Kodaikanala)- कोडाईकनाल शहरातील कोडाई तलाव हे एक आकर्षक ठिकाण आहे. अनेक लोक तो पाहण्यासाठी येत असतात. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात स्थित, कोडाईकनाल येथे पर्यटकांसाठी रोइंग बोटी आणि पेडलिंग बोटी उपलब्ध आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.