Flemingo Birds At Jayakwadi In Aurangabad esakal
पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण (Paithan)येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरातील पक्षी अभयारण्य परिसरातील पाणलोट क्षेत्रात यंदा चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर फ्लेमिंगो (अग्नीपंख) या पाहुण्या पक्षाचे उशिरा आगमन झाले आहे. पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षण करताना फ्लेमिंगो पक्षाचा हा थवा सोमवारी (ता. २८) आढळून आला आहे. यामुळे पक्षीमित्रात आनंद व्यक्त होत आहे. निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये फ्लेमिंगो पक्षाचे होणारे आगमन उशिरा झाले असल्याचे निरीक्षण पक्षीमित्रांकडून नोंदविण्यात आले आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या औरंगाबाद पाणीपुरवठा जवळील पाणलोट क्षेत्रात फ्लेंमिगो पक्षाचा हा लक्षणीय थवा पाहण्यास मिळत आहे. देश-विदेशातील विविध प्रजातींच्या परदेशी पाहुण्या पक्षांची लाखोंची संख्या वाढल्यानंतर राज्य शासनाने पैठण येथे १९८६ ला जायकवाडी पक्षी अभयारण्याची स्थापना केली आहे. दरम्यान, लाखोंच्या संख्येने लडाख, अमेरिका, सैबेरिया, मध्य आशिया, युरोप, आफ्रिका, नेपाळ, चीन, पाकिस्तान अशा दूर देशावरून स्थलांतर करून हे पक्षी येतात. त्यात विविध देश-विदेशातील २५० जातींच्या पक्षाचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतीय द्विपकल्पातून धोबी, पान हळदा, पिवळा धोबी हे आकर्षित पक्षी सुद्धा आले आहे.प्रत्येक वर्षी जायकवाडी पक्षी अभयारण्यात धरण निर्मितीनंतर परदेशी पाहुण्यां पक्षाचे आगमन होण्यास सुरुवात झाली. विस्तीर्ण जलाशय परिसरातील शेती, मत्स्यपालन, उथळ जलाशय, जलाशयावर पडणारा सूर्यप्रकाश थेट तळापर्यंत जात असल्याने खाद्य मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे हे जलाशय परदेशी पक्षांसाठी उत्कृष्ट अधिवास बनले गेले आहे . ऑक्टोबरमध्ये आलेल्या या पक्ष्यांचा अधिवास हा मार्चपर्यंत राहणार आहे.हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढताच जायकवाडी पक्षी अभयारण्यात देश-विदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. दरवर्षी हिवाळा सुरू झाल्यानंतर थंडीचा कडाका वाढला की, देशविदेशातून विविध स्थलांतरित पक्षी येथे येतात. यावर्षीसुद्धा देशविदेशातून पक्षी आले आहेत. परंतु सुरवातीला यात फ्लेंमिगो या पक्षाचा थवा कुठेच दिसून आला नाही. परंतु आज तब्बल चार महिन्यानंतर फ्लेमिंगोचा एक मोठा थवा दिसला आहे. यामुळे नक्कीच आनंद झाला आहे. - सुनील पायघन, पक्षी मित्र, पैठण. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.