first night after marriage Sakal
लग्नानंतर (Marriage) पतीसोबत (Husband) पहिल्या रात्री एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा आपण सर्वांनीच ऐकली असेल. मुलांना आपल्या पत्नीसाठी भेटवस्तू निवडणे तसं सोपे जाते. परंतु मुलींना मात्र ते तितकेच अवघड जाते. आपण निवडलेली भेटवस्तू (Gift) पतीला आवडेल की नाही, या गोंधळात मुली अनेकदा आपल्या पतीसाठी भेटवस्तू निवडण्यास कचरतात. आपल्या पतीला त्यांची भेट आवडेल की नाही या गोंधळात अनेक मुली असतात. तुम्हीसुद्धा याच विचाराने हैराण असाल तर आज आपण अशा काही भेटवस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री पतीला देऊ शकता. (Gifts to be given on First Night of Marriage to Husband)
1) परफ्यूम (Perfume)- बहुतेक पुरुषांना चांगल्या वासाचे पर्फ्युम खूप आवडतात आणि म्हणूनच तुम्ही त्यांना परफ्यूम गिफ्ट देऊ शकता. परफ्यूम निवडताना दीर्घकाळ टिकणारा सुगंध असलेला परफ्यूम निवडा. याशिवाय ब्रँडेड परफ्यूम सेटही निवडता येतो.
2) इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स (Electronic Gadgets)- इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हा माणसाचा चांगला मित्र मानला जातो. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी रोमँटिक भेटवस्तू शोधत असाल, तर तुमच्या पतीला पहिल्या रात्री गिफ्ट करण्यासाठी गॅझेट्स हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही वायरलेस ब्लूटूथ इअरफोन/हेडफोनपासून किंवा त्याच्या आवडीनुसार काहीही गिफ्ट करू शकता. 3) दागिने (Jewelery)- लग्नाच्या पहिल्या रात्री दिलेली भेट आयुष्यभर लक्षात राहते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पतीला दागिने भेट देण्याचा विचार करू शकता. मुलांच्या दागिन्यांमध्ये तुम्ही ब्रेसलेट, कडा किंवा चेन गिफ्ट करू शकता.
4) अॅक्सेसरीज (Accessories)- जर तुम्हाला पहिल्या रात्री नवऱ्याला काही गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही लग्नात टाय, स्कार्फ, सनग्लासेस, बेल्ट, कॅप, पर्स इत्यादी निवडू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळतील,
5) ग्रूमिंग किट (Grooming Kit)- आजकाल, पुरुष त्यांच्या स्वच्छतेची खूप काळजी घेतात आणि प्रेझेंटेबल दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीला ग्रूमिंग किट भेट देऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास त्यावर काही नोट्स लिहून तुम्ही ते आणखी खास बनवू शकता.
6) जिम अॅक्सेसरीज (Gym Accessories)- जर तुमच्या पतीला निरोगी जीवनशैली आवडत असेल आणि तो दररोज व्यायामशाळेत जात असेल, तर तुम्ही जिमसाठीचे काही साहित्यही त्याला भेट देऊ शकतात. ट्रेडमिल, डंबेल आणि होम जिम किट सारखी जिमची उपकरणे भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.