Republic Day: भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्लीतील राजपथावर मोठ्या दिमाखदार सोहळ्याच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण सिद्धतेचे शक्तिप्रदर्शन यानिमित्ताने केले जात आहे. या कार्यक्रमाची खास क्षणचित्रे. (Highlights of the grand program on the occasion of Republic Day)
1. दिल्लीतील राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले. 2. भारताच्या प्रजासत्ताक दिनी दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध राज्यांच्या चित्ररथांनी देशवासीयांचे लक्ष वेधले. 3. भारताच्या भूदलाची ताकद असणारे विविध रणगाडे राजपथावर पाहायला मिळाले.4. सेंच्युरियन टँक, PT-76, MBT अर्जुन MK-I आणि APC टोपाझच्या तुकड्या दिल्लीतील राजपथ येथे RepublicDay परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.5. परेडदरम्यान सेंच्युरीयन टॅकची खास झलक देशवासीयांना पाहायला मिळाली.6. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित यंदाच्या दिमाखदार सोहळ्यांची या रणगाड्यांनी शोभा वाढवली. 7. प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्यावतीने लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.8. हवाई दलाच्या विविध विमानांनी विविध फॉर्मेशनच्या माध्यमातून चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. त्यात राफेलसह अन्य लढाऊ विमानांचा समावेश होता. 9. लष्कराच्या जवानांनी केलेल्या अनेक साहसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. 10. भारतीय लष्कराच्या विविध रेजिमेंट यावेळी राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. Republic Day Celebration of Indiaसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.