फोटोग्राफी

एमआयडीसीतील मोक्‍याच्या जागी 'हॉटेल'चे अतिक्रमण

सकाळ डिजिटल टीम

दोन किलोमीटरमध्ये अठरा ठिकाणी टपऱ्या; नाल्याजवळही बेकायदा बांधकाम 

पिंपरी - मालकी हक्काच्या वादात भोसरी एमआयडीसीमध्ये अनेक रस्त्यांवर खासगी हॉटेल व्यावसायिकांनी आपले बेकायदा बस्तान बसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी आणि महापालिका यांच्यातील "तू-तू-मै-मैमुळे' या मोक्‍याच्या जागांवर अतिक्रमण करून व्यावसायिकांनी गिळंकृत केल्या आहेत. 

शहराच्या एमआयडीसी विभागात अनेक ठिकाणी अशी बेकायदा हॉटेल्स, चहा, पानाच्या टपऱ्या दिसतात. काही ठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला दुकाने थाटलेली दिसतात. या जागा व्यावसायिकांनी बेकायदा बळकावल्या आहेत. ज्याचा एमआयडीसी प्रशासनालाच पत्ता नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या "क' प्रभाग कार्यालयापासून ते लांडेवाडी-भोसरीपर्यंत दोन किलोमीटर पट्ट्यात तब्बल 18 ठिकाणी व्यावसायिकांनी हॉटेल्स थाटली आहेत. संपूर्ण एमआयडीसीत अशा शेकडो ठिकाणी अतिक्रमणाचे जाळे पसरलेले पाहायला मिळते. पण, या व्यावसायिकांना साधी विचारणाही प्रशासनाने केलेली नाही. काही ठिकाणी अशा हॉटेलसाठी चोरून वीज घेतली जाते, त्याचा तपास महावितरण विभागाने केलेला नाही. 

या संदर्भात एमआयडीसी प्रशासनाला विचारले असता, एमआयडीसीतील रस्ते महापालिकेकडे पूर्वीच हस्तांतरित केले असून त्याची जबाबदारी आमच्याकडे नाही असे सांगण्यात आले. तर, महापालिकेचे अधिकारी म्हणाले की, एमआयडीसीने आमच्याकडे रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी दिले आहेत. त्याचा मालकी हक्क दिलेला नसल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, भोसरीतील एका राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे ही अतिक्रमणे होत असून त्यांचे कार्यकर्तेच हॉटेल व्यावसायिकांकडून हप्ते घेत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

एमआयडीसीने महापालिकेकडे रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी दिले आहेत मालकी हक्क नाही. त्यामुळे तेथे अतिक्रमण होते की, नाही हे पाहण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची आहे. 
- अंबादास चव्हाण, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

SCROLL FOR NEXT