पावसाळ्यात उगवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्या माहीत आहेत का? Canva
फोटोग्राफी

पावसाळ्यात उगवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्या माहीत आहेत का?

पावसाळ्यात उगवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्या माहीत आहेत का? जाणून घ्या शक्तिवर्धक भाज्यांबाबत

विजयकुमार कन्हेरे

ग्रामीण भागातील लोकांना पावसाळ्यात या भाज्या सहजासहजी उपलब्ध होतात. आरोग्यवर्धक, त्रिदोषहारक, शक्तिवर्धक असलेल्या या रानभाज्या दुर्लक्षित आहेत.

कुर्डुवाडी (सोलापूर) : पाऊस पडल्यानंतर खतांचा वापर किंवा फवारणी न करता निसर्गतः ग्रामीण भागात उगवून येणाऱ्या रानभाज्या (Vegetables) दुर्लक्षित असून, अनेकांना या भाज्या ओळखता देखील येत नाहीत. शासनाच्या कृषी विभागाच्या (Department of Agriculture) वतीने वर्षातून एकदा औपचारिकता पूर्ण करण्यासाठी रानभाज्यांचा महोत्सव भरवला जातो. या रानभाज्यांचे आरोग्यदृष्ट्या असलेले उपयोग व माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

सध्या बाजारात येणाऱ्या बऱ्याचशा भाज्यांना रासायनिक खते दिलेली असतात व कीडनाशकांची फवारणी केलेली असते. परंतु, रानभाज्यांसाठी पेरणी, मशागत यांसारखे सोपस्कार करण्याची गरज लागत नाही. या भाज्या शेतात, जंगलात, बांधावर, माळरानावर कोणताही खर्च न करता आपोआप उगवून येतात. रासायनिक खते दिलेली नसतात. यांच्यावर कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नसते. ग्रामीण भागातील लोकांना पावसाळ्यात या भाज्या सहजासहजी उपलब्ध होतात. आरोग्यवर्धक, त्रिदोषहारक, शक्तिवर्धक असलेल्या या रानभाज्या दुर्लक्षित आहेत.

पाहा या रानभाज्या...

पाथरी
सातपुती
कुलिची
कुरडू
करटोली
हादगा
रानभाज्या

आयुर्वेदिक व आरोग्यदृष्ट्या या भाज्या खूप उपयुक्त आहेत. परंतु, शहरातील बहुतांश नागरिकांना या भाज्यांबद्दल माहिती नाही. यांचे उपयोग माहिती नाही किंवा त्या कुठे उपलब्ध होतात याबद्दल देखील माहिती नाही. शासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात साधारणपणे प्रत्येक तालुक्‍यात या भाज्यांचा महोत्सव भरवला जातो. यामध्ये बचत गट किंवा स्वयंसहाय्यता समूह व परिसरातील काही शेतकरी रानभाज्या प्रदर्शनास ठेवतात. परंतु, हे पाहण्यासाठी लोक बऱ्याच वेळा उपस्थित नसतात. औपचारिकता म्हणून हे प्रदर्शन भरवण्यापेक्षा सर्वसामान्यांपर्यंत या रानभाज्यांची माहिती व उपयुक्तता पोचणे गरजेचे आहे. भाज्या ओळखता आल्या पाहिजेत व त्यांची उपयुक्तताही माहिती असली पाहिजे. निमशहरी किंवा शहरी भागातील वयाची चाळिशी ओलांडलेल्या व ग्रामीण भागात संपर्क असलेल्यांना काही प्रमाणात या भाज्या माहिती आहेत; परंतु इतरांना सुद्धा माहिती होणे आवश्‍यक आहे. यासाठी शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करून नियोजन करणे आवश्‍यक आहे.

रानभाज्यांची नावे : पाथरी, कमळकाकडी, कुरडू, ब, चिवळ, भोकर, हादगा, काठेमाट, तांदूळजा, रानमाठ, शेवळं, टाकळा, रानकेळ, भारंग, बिंडा, आघाडा, चिघळ, रानकंद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: विदर्भाने इतिहास घडवला! थरारक फायनल जिंकून पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, ODI: न्यूझीलंडविरुद्ध मालिका तर गमावली, आता विराट कोहली-रोहित शर्मा भारतीय संघाकडून पुन्हा कधी खेळणार?

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

SCROLL FOR NEXT