Benefits of Getting Married Before the Age of 30
Benefits of Getting Married Before the Age of 30 esakal
फोटोग्राफी

तिशीच्या आत लग्न कराल तर फायद्यात राहाल, वाचा ५ फायदे

सकाळ डिजिटल टीम

सध्या मुला-मुलींना त्यांचं करिअर, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र्य असणं जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे अनेकजण तिशीनंतर लग्न करण्याचा विचार करतात. पण, तिशीनंतर लग्न झालं तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं

लग्नासाठी जी परिपक्वता लागते ती वयाच्या २१ वर्षांनंतर तुमच्यात अधिक येते. त्यामुळे सरकारने लग्नाचे वय (Marriage Age) २१ वर्षे निश्चित केले आहे. पण, . नात्यात प्रत्येकाला १०० टक्के योग्य जोडीदार (Partner) मिळतोच असं नाही. काहींना काही गुण-दोष दोघांच्यात असतात. पण हे गुण-दोष अधिक चांगल्या प्रकारे समजून पुढे जायचे असेल तर काही निर्णय योग्य वयात घ्यावे लागता. तुम्ही जर तिशीच्या आत लग्न केलेत तर त्याचे पाच चांगले फायदे आहेत.(Benefits of Getting Married Before the Age of 30)

एकमेकांना समजून घेण्यासाठी योग्य वेळ- कमी वयात लग्न केल्याने मुलींना नवरा आणि सासरच्या लोकांना समजून घेण्यासाठी जास्त वेळ मिळतो. सासू- सासरे सुनेला मुलीप्रमाणे समजून घेतात. तसंच, कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. कधी कधी सासू सुनेला स्वयंपाक करायला शिकवते. म्हणजेच तुम्हाला नव्या गोष्टी शिकता येऊ शकतात. नवा अनुभव तुम्ही सहजपणे आत्मसात करू शकता. (Ideal Age to Get Married)
रोमान्स टिकेल दिर्घकाळ - तिशीच्या आत लग्न केल्याने वैयक्तिक आयुष्याबरोबरच रोमान्सही दिर्घकाळ टिकेल. अशी जोडपी दिर्घकाळ तरूण राहतात. तसेच ती एकमेकांसोबत खूप रोमँटिक असतात.
मुले होण्यासाठी कमी दबाव- तुमचे कमी वयात लग्न झाल्याने घरातलेही लवकर मुलं होऊ देण्यासाठी जबरदस्ती करत नाहीत. वय जास्त असेल तर वर्षाच्या आत मुलं होत नाही म्हणून अनेकजण टोमणे मारतात. त्यामुळे त्रास होतो तो वेगळाच. उलट, कमी वयात लग्न करणाऱ्या जोडप्यांना नेहमीच मुलांना आरामात जन्म देण्याचा आणि त्यांच्या आयुष्याचा आनंद घेण्याचा सल्ला दिला जातो.
जबाबदारीची जाणीव- कमी वयात लग्न केल्याने मुला-मुलींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. मुलींची मानसिकता आणि परिपक्वता पातळी 21 ते 25 वर्षे वयाच्या मुलांपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे मुलींना गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतात.
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी वेळ -उशीरा लग्न केले की मुलींना काहीवेळा करिअरमधून ब्रेक घ्यावा लागतो. पण तुम्ही योग्य वयात लग्न केले तर तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो. आधीच तुम्ही तुमचे काम आणि करिअर पुढे नेऊ शकता.. तसेच पती-पत्नी मिळून कोणताही व्यवसाय किंवा कोणतेही काम सुरू करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT