Top 5 Scooters in India Esakal
फोटोग्राफी

Top 5: दमदार मायलेज आणि शानदार विक्री होणाऱ्या टॉप स्कूटर्स

Top 5 Scooters in India: 110 CC सेगमेंटच्या स्कूटरला खरेदी करणं भारतीय पसंद करतात.

सकाळ डिजिटल टीम

भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप ५ स्कूटर्स (Top 5 Scooters in India):

भारतात मोटारसायकलसोबतच स्कूटरचे चाहतेही कमी नाहीत. स्कूटर चालविण्यास आरामदायक तर असतातच, परंतु स्टायलिश देखील असतात. 110 सीसी इंजिन असलेल्या स्कूटर्सना सर्वाधिक मागणी आहे, कारण त्या पॉवरसोबत चांगले मायलेजही देतात. आज आपण तुम्हाला अशा भारतातील 100 CC च्या टॉप 5 स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत.

1. होण्डा अ‍ॅक्टिव्हा (Honda Activa 6G)-

ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. तिची एक्स शोरूम किंमत 69,645 रुपयांपासून सुरू होते आणि 72,891 रुपयांपर्यंत जाते. Activa 6G मध्ये 109.5cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 7.79 PS आणि 8.79 Nm जनरेट करते. यात ACG सह सायलेंट स्टार्ट, टेलिस्कोपिक सस्पेंशन, एक्सटर्नल फ्युएल फिल, इंजिन स्टार्ट-स्टॉप स्विच, भरपूर स्टोरेज आणि एलईडी हेडलॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

2. हिरो प्लेजर प्लस (Hero Pleasure Plus)-

हिरो प्लेजरमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. ही एक किफायतशीर आणि चालवायला सोपी स्कूटर आहे. यात 110.9cc चे सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 8.1PS आणि 8.70Nm टॉर्क जनरेट करते. तिच्या टॉप व्हेरियंटमध्ये i3S स्टार्ट/स्टॉप सिस्टम आणि ब्लूटूथ-सक्षम स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील मिळते. Pleasure Plus ची किंमत 61,900 रुपयांपासून सुरू होते आणि 71,900 रुपयांपर्यंत जाते.

3. होंडा डिओ (Honda Dio)-

Honda Dio ही होण्डाची आकर्षक स्कूटर आहे. तिच्यामध्ये Activa 6G प्रमाणेच 109.5cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. परंतु ही स्कूटर 7.76PS चा पॉवर आणि 9 Nm चा पीक टॉर्क देते. तसेच डिओचं वजनही कमी आहे, ज्यामुळे ती ऑपरेट करणे देखील सोपे आहे. डिओची एक्स शोरूम किंमत 65,075 रुपयांपासून ते 70,973 रुपयांपर्यंत आहे.

4. टिव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter 110)

ही देखील देशातील लोकप्रिय स्कूटर आहे. TVS Jupiter 110 ची किंमत 66,273 रुपयांपासून सुरू होते आणि 76,573 रुपयांपर्यंत जाते. तिच्यात 109.7cc चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 7.88PS ची पॉवर आणि 8.8Nm चा पीक टॉर्क देते. यात एलईडी हेडलॅम्प, लांब सीट्स, लेग स्पेस, ट्यूबलेस टायर्स, अ‍ॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन देण्यात आले आहे. मोबाईल चार्जिंग, सीटच्या आत सुरक्षित बॉक्स, एक्सटर्नल फ्युएल फिलर, फोल्डेबल मिरर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

5. टिव्हीएस स्कूटी झेस्ट (TVS Scooty Zest)-

TVS स्कूटी झेस्ट ही कॉम्पॅक्ट स्कूटर आहे. झेस्ट आकाराने लहान आणि वजनाने खूप हलकी आहे. तिच्यामध्ये 109.7cc सिंगल-पॉट इंजिन आहे जे 7.81PS पॉवर आणि 8.8Nm पीक टॉर्क निर्माण करते. स्कूटरची किंमत 64,641 रुपयांपासून सुरू होते आणि 66,318 रुपयांपर्यंत जाते. यात हेडलॅम्प, ड्युअल टोन सीट्स आणि एलईडी टेल लॅम्पसह डीआरएल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Politics: भिवंडीत तिकीट वाटपावरून बंडखोरी; सपा नेतृत्वाच्या अडचणी वाढल्या! अंतर्गत फुट उघड, नेमकं समीकरण काय?

Vijay Hazare Trophy: पडिक्कलची चार सामन्यात तिसरी सेंच्युरी; सर्फराज खान-ऋतुराज गायकवाडचीही वादळी शतके; टीम इंडियात कोणाला संधी?

Pimpalwandi Leopard News : पिंपळवंडीत बिबट्याचा थरार संपला! थर्मल ड्रोनच्या निगराणीनंतर अखेर 'सहा वर्षांचा' बिबट्या पिंजऱ्यात कैद

New IPO : IPO अलर्ट! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! वर्षातील अखेरचा IPO आजपासून सुरू; जाणून घ्या प्राइस रेंज, GMP आणि डिटेल्स

Navi Mumbai Airport: विमानसेवा सुरू, नेटवर्क गायब! नवी मुंबई विमानतळाची दूरसंचार कंपन्यांवर दरवाढ

SCROLL FOR NEXT