Virajas kulkarni and shivani rangole wedding  sakal
फोटोग्राफी

PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव..

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी ७ मे रोजी विवाह बंधनात अडकणार असून नुकताच मेहंदीचा सोहळा पार पडला.

नीलेश अडसूळ

सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. मराठीत देखील असे काही कपल आहेत ते लवकरच लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत आहेत. यापैकी एक कपल म्हणजे विराजस कुलकर्णी (virajas kulkarni ) आणि शिवानी रांगोळे (shivani rangole) आहे. येत्या ७ मे रोजी ते विवाह बंधनात अडकणार असून (Virajas Kulkarni-Shivani Rangole Wedding) लग्नापूर्वीच्या समारंभांना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा मेहंदीचा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे काही खास फोटो..

या सोहळ्यासाठी शिवानीने खास हिरव्या रंगाचा काठपदराच्या साडीचा ड्रेस तयार केला आहे. शिवाय त्याला शोभतील असे फुलांचे दागिने देखील घातले आहे.
'डावीकडून चौथी बिल्डिंग' या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. विराजसनं 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो लेखक दिग्दर्शकही आहे.
'बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. 'सांग तू आहेस ना' आणि ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर' या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत.
अलिकडेच शिवानी आणि विराजसने एका जाहिरातीसाठी लग्नाचा सीन शूट केला होता. तेव्हा त्यांनी गुपचूप लग्न केलं,अशा चर्चांना खुप उधाण आलं होतं. पण त्यांचा खरा विवाह येत्या ७ मे रोजी पुण्यात होणार आहे.
विराजस आणि शिवानी बरीच वर्षे एकमेकांच्या प्रेमात आहेत. काही दिवसांपूर्वी विराजसने शिवानीला गोल्ड रिंग देऊन प्रपोस केलं होतं. त्यासाठी त्याने एक खास सरप्राईस प्लॅन केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land scam: बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; तहसीलदारांचा जामीन फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?

Viral Video: धावत्या रिक्षात कपलचा सुरु होता रोमान्स, लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा

Latest Marathi News Live Update : जमिनीचा बेकायदा ताबा घेत खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरला अटक

SCROLL FOR NEXT