Tehsildar Surana while inquiring about the condition of poisoned children. Neighboring Medical Officer Dr. Pranjali Patil etc. esakal
जळगाव

Jalgaon Food Poisoning : गांधली येथील 10 बालकांना विषबाधा; ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Food Poisoning : तालुक्यातील गांधली येथील दहा बालकांनी एरंडी (जट्रोफा)सदृश बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. मुलांना हगवण आणि उलट्यांचा त्रास होत असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. (10 children poisoned in Gandhali jalgaon news)

तालुक्यातील गांधली येथील जोया सुलतान पिंजारी (वय ९), अयान सुलतान पिंजारी (११), अर्जुन सुरेश भिल (१०), करण सोमा भिल (९), अक्षरा सुनील भिल (१०), नर्गिस सुलतान पिंजारी (३), गोकुळ प्रकाश भिल (१२), अश्विनी सुरेश भिल (११), संगीता नारायण संदानशिव (१०), किरण अविनाश भिल (११, सर्व रा. गांधली) ही सर्व मुले गुरुवारी (ता. ५) दुपारी दोनच्या सुमारास एका मंदिराच्या प्रांगणाच्या मागच्या बाजूला खेळत असताना एकाने एरंडी (जट्रोफा)च्या बियांसारख्या बिया आणल्या. त्या बिया सर्व मुलांनी खाल्ल्या. '

काहींनी एक-दोन बिया; तर काहींनी जास्त खाल्ल्याने सुमारे साडेतीनच्या सुमारास त्यांना अचानक हगवण, उलट्या होऊ लागल्या. सुरवातीला दोन बालके, नंतर पाच, नंतर तीन अशी एकापाठोपाठ दहा बालके उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रांजली पाटील, डॉ. प्रकाश ताडे यांनी तातडीचे उपचार सुरू केले.

प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना घटना कळताच त्यांनी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवून बालकांच्या आरोग्य सेवेबाबत आदेश दिले. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनीही रुग्णालयात जाऊन बालकांची चौकशी केली.

मंत्री अनिल पाटील यांच्या डॉक्टरांना सूचना

घटनेची माहिती मिळताच मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना तातडीने उपचार करण्याच्या सूचना केल्या. तसेच, नातेवाइकांनाही फोन करून धीर दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संवाद साधत जिल्हास्तरावरून बालरुग्ण डॉक्टरांची टीम पाठविण्याच्या सूचना केल्याने तातडीने टीम रवाना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT