fund esakal
जळगाव

Jalgaon News ; कोदगाव, वलठाण, पाटणादेवी रस्त्यासाठी दहा कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : सुमारे सात गावातील ग्रामस्थांसाठी तसेच विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणाऱ्या चाळीसगाव- कोदगाव- बेलदारवाडी- वलठाण- पाटणादेवी या रस्त्याचे (Road) भाग्य अखेर उजळले आहे. (10 crore approved for Kodgaon Valthan Patna Devi road jalgaon news)

आमदार मंगेश चव्हाण यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी तब्बल दहा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. चाळीसगाव- कोदगाव- बेलदारवाडी- वलठाण- पाटणादेवी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्था झाली होती.

जवळपास साडेबारा किलोमीटरचा हा रस्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह या भागातील सात ते आठ गावांमधील ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्‍वासन आमदार चव्हाण यांनी दिले होते.

त्यानुसार, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. हा रस्ता पूर्णत्वास आल्यानंतर कोदगाव, बेलदारवाडी, गणपूर गाव व गणपूर तांडा, शामवाडी, ३२ नंबर तांडा, वलठाण व पाटणादेवी गावातील ग्रामस्थांना या रस्त्याचा फायदा होईल.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

ही सर्व गावे विकासाच्या प्रवाहात जोडली जाणार आहेत. बेलदारवाडी (श्री क्षेत्र सिद्धेश्वर आश्रम) येथील तीर्थक्षेत्रासह गणपूर व गणपूर तांडा तसेच कोदगाव या गावांना चाळीसगाव येथे येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. बेलदारवाडी येथील आश्रमात दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. या रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्यानंतर या सर्वांची मोठी गैरसोय आता दूर होणार आहे.

तसेच वलठाण व कोदगाव धरण क्षेत्रातून हा रस्ता जात असल्याने या भागातील उस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. आता त्यांनाही पक्का रस्ता मिळणार असल्याने त्यांच्यासाठी देखील सोयीचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT